पुण्यात कात्रज बोगद्याजवळ दरड कोसळली; शहरात १५ ठिकाणी झाडपडीच्या घटना

शहर आणि धरण क्षेत्रात मंगळारपासून पावसाने चांगलीच हजेरी लावलेली आहे

katraj landslid

पुणे शहर आणि आसपासच्या भागात काल(बुधवार) दिवसभर पावसाने जोरदार हजेरी लावली. त्याच दरम्यान कात्रजच्या जुन्या बोगद्यापासून ३०० मीटर अंतरावर रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळण्याची घटना देखील घडली.

पुणे शहर आणि धरण क्षेत्रात मंगळारपासून पावसाने चांगलीच हजेरी लावलेली आहे. त्यामुळे पुणेकर नागरिकांवरील एक दिवसआड पाण्याचे संकट दूर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काल सकाळपासून देखील शहरातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. तर त्याच दरम्यान शहरातील तब्बल १५ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत.

या सर्व घडामोडी दरम्यान कात्रजच्या जुन्या बोगद्यापासून ३०० मीटर अंतरावर रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळण्याची घटना घडली. ही माहिती पुणे महापालिकेच्या आपत्ती विभागाला कळताच, अग्निशामक विभाग, पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचलवे. त्यानंतर तत्काळ रस्त्यावरील दरड जेसीबीच्या मदतीने बाजूला केली. त्यानंतर तेथील मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आल्याचे पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pain collapses near katraj tunnel in pune tree felling incidents at 15 places in the city svk 88 msr

Next Story
करमाळय़ात चाळीस वर्षांचा रताळशेती प्रपंच ; राज्यभरात उत्पादनाला मागणी; आषाढीला सर्वाधिक विक्री
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी