शेकडो वर्षांची परंपरा असलेली पंढरीची वारी आधुनिक काळात परंपरेचे रूप घेऊन वाटचाल करीत असली, तरी आधुनिक तंत्रस्नेही साधनांचा वापर करून नव्या काळाशीही जोडून घेत आहे. हे सिद्ध करणारी फेसबुक दिंडी यंदा ‘ती’ची वारी हा संदेश घेऊन शुक्रवारपासून (१६ जून) समाज माध्यमावर प्रकटणार आहे.  फेसबुक दिंडीचे संस्थापक स्वप्नील मोरे यांनी ही माहिती दिली. १६ जूनपासून सुरू होणारा वारीचा सोहळा स्त्रीशक्तीचा आगळावेगळा जागर करत ‘ती’च्या विषयी बरेच काही बोलणार आहे.

वारी ही संघर्षांची, अस्तित्वाची, परिश्रमाची, जिद्दीची आणि सहनशीलतेची कहाणी असते, हे वारकऱ्यांच्या माध्यमातून वर्षांनुवष्रे अनुभवत आहोत. मग जिचा संघर्ष विविध पातळय़ांवर जन्मापूर्वीच सुरू होतो, ‘ती’च्या विषयी लोकमानस जागृत करण्यासाठी वारीचे माध्यम का उपयोगात आणू नये, या विचारातून ‘ती’ची वारी ही संकल्पना सुचली, असे फेसबुक दडीचे संस्थापक स्वप्नील मोरे यांनी सांगितले.

mumbai ramabai ambedkar nagar zopu marathi news
रमाबाई आंबेडकर नगर पुर्नविकास : ‘झोपु’चे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात, पुढील आठवड्यात १६८४ रहिवाशांची प्रारूप यादी प्रसिद्ध करणार
Ramnavami 17th April 2024 Panchang & Rashi Bhavishya
रामनवमी, १७ एप्रिल पंचांग: मेष- मीन, प्रभू श्रीराम कुणाला पावणार? कुणाच्या कुंडलीत प्रेम, पद, पैसे प्राप्तीचा योग?
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
prashant damle birthday special article
प्रशांत दामले : ‘बेस्ट’मध्ये नोकरी ते रंगभूमीचा ‘विक्रमादित्य’, व्यवहार कुशल निर्मात्याचा बहुरुपी प्रवास

फेसबुक दिंडीचा आता उत्तम प्रचार आणि प्रसार झाला आहे. त्याच माध्यमातून  यंदा ‘ती’ची वारी समाज माध्यमावर अवतरणार आहे. गर्भिलगनिदान आणि स्त्रीभ्रूणहत्या, बाललैंगिक अत्याचार, लैंगिक अत्याचार, मासिक पाळी समज-गरसमज, बालविवाह, हुंडा, कौटुंबिक हिंसाचार, विधवांच्या समस्या, रूढी परंपरांत अडकलेल्या स्त्रिया, स्त्रीसंतांचे कार्य, त्यांची अभिव्यक्ती आणि कर्तृत्ववान स्त्रिया असे मुद्दे आम्ही ‘ती’ची वारीमधून फेसबुक दिंडीद्वारा पुढे आणणार आहोत आणि वारीच्या काळात जनजागृती करणार आहोत. मंगेश मोरे, अमित कुलकर्णी, सूरज दिघे, राहुल बुलबुले, ओंकार मरकळे, सुमित चव्हाण, अमोल निंबाळकर आणि ओंकार महामुनी हा फेसबुक दिंडीचा चमू आहे. दिंडीचे अ‍ॅप्लिकेशन app.facebookdindi.com या लिंकवर डाऊनलोड करता येईल तसेच इव्हेंट जॉइन करण्यासाठी https:www.facebook.com/events/1187595294700399 या लिंकवर जाता येईल, असेही स्वप्नील मोरे यांनी सांगितले.