Video : पानशेत धरणफुटीची साक्षीदार आजही आहे तग धरुन उभी

12 जुलैच्या त्या प्रलयाची भयावहता दर्शवणारी एक निशाणी अजूनही पुणेकरांनी जपून ठेवली आहे.

Pune news, Pune latest news, Pune news live, Pune news today, Today news Pune,pune news updates,pune news today,Pune news,panshet,Mahajan,Gokhale Institute of Politics and Economics
12 जुलैच्या त्या प्रलयाची भयावहता दर्शवणारी एक निशाणी अजूनही पुणेकरांनी जपून ठेवली आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे पानशेत आणि खडकवासला धरण फुटल्याच्या घटनेला ६० वर्ष पूर्ण झाली आहेत. 12 जुलै 1961 या दिवशी हे धरण फुटून धरणातील सर्व पाणी पुणे शहरात घुसून हाहाकार माजला होता. 12 जुलैच्या त्या प्रलयाची भयावहता दर्शवणारी एक आठवण अजूनही पुणेकरांनी जपून ठेवली आहे. ‘160, नारायण पेठ’ ही चार मजली इमारत. त्या दिवशी या इमारतीच्या तिस-या मजल्यापर्यंत पाणी आले होते. पाहूया ही इमारत.

१२ जुलै रोजी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पानशेत घरण फुटले आणि पुराचे पाणी शहरात शिरले. बंडगार्डन पुलाचा अपवाद वगळता शहरातील सर्व पूल पाण्याखाली गेले होते. शनिवार, नारायण, कसबा आणि सोमवार पेठ भागातील घरांची मोठय़ा प्रमाणावर हानी झाली. अनेकांचे संसार पुराच्या पाण्याने वाहून गेले. या आपत्तीतून सावरण्यासाठी पुढे बराच कालावधी गेला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Panshet incident video panshet dam burst incident complete 60 years 12 july 1961 bmh