आरोपींमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांसह डॉक्टर, शिक्षकाचा समावेश

पुणे : आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने लातूरमधील सार्वजनिक आरोग्य विभागताील मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यासह पाच जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये डॉक्टर, शिक्षकाचा समावेश असून  प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात आतापर्यंत अकरा जणांना अटक करण्यात आली आहे. 

Summer vacation has been announced for schools in the state When will the school start
राज्यातील शाळांना उन्हाळी सुटी जाहीर… शाळा सुरू कधी होणार? शिक्षण विभागाने दिली माहिती…
The nine judge bench of the Supreme Court
सर्वोच्च न्यायालयाचे नऊ न्यायाधीशांचे खंडपीठ कोणत्या प्रकरणांवर सुनावणी करणार?
Rosary School Director s Arrest Court Extends Vinay Arhana s Custody in Loan Misappropriation Case
रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हानाच्या पोलीस कोठडीत चार दिवसांनी वाढ
Calcutta High Court
संदेशखालीतील प्रकरण अत्यंत लाजिरवाणे; कलकत्ता उच्च न्यायालयाचे ताशेरे

या प्रकरणी सार्वजनिक आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत व्यंकटराव बडगिरे (वय ५०, रा. योगेश्वरी नगरी, अंबेजोगाई, जि. बीड) डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड (वय ३६, रा. एकात्मता कॉलनी, अंबेजोगाई, जि. बीड), उद्धव प्रल्हाद नागरगोजे (वय ३६, रा. तितरवणे, ता. शिरूर कासार, जि. बीड), शाम महादू म्हस्के (वय ३८ ,रा. पंचशीलनगर, अंबेजोगाई, जि. बीड), राजेंद्र पांडुरंग सानप (वय ५१, रा. शामनगर, जि. बीड) यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात यापूर्वी विजय मुऱ्हाडे, अनिल गायकवाड, बबन मुंढे, सुरेश जगताप, संदीप भुतेकर, प्रकाश मिसाळ यांना अटक करण्यात आल्याची माहिती सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली.

प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणाचा सायबर गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत होता. तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी (७ डिसेंबर) पाच आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालायने त्यांना १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, उपनिरीक्षक अमोल वाघमारे, संदेश कर्णे, नवनाथ जाधव, शिरीष गावडे, प्रसाद पोतदार आदींनी कारवाई केली.

आरोग्य विभागातील अधिकारी सूत्रधार

आरोग्य विभागातील लातूर विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे याने प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात अंबेजोगाई येथील मनोरुग्णालायातील डॉक्टर संदीप जोगदंड यांच्याकडून दहा लाख रुपये तसेच शाम म्हस्के याच्याकडून पाच लाख रुपये  घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे. बडगिरे याने प्रश्नपत्रिका कोठून मिळवली, या दृष्टीने तपास सुरू आहे.