सातव्या दिवशी होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी बुधवारी (२३ सप्टेंबर) शहरातील मुख्य विसर्जनासाठी पार्किंगमध्ये बदल करण्यात आले आहेत. हीच व्यवस्था शुक्रवारी (२५ सप्टेंबर) नवव्या दिवशी होणाऱ्या विसर्जनासाठी लागू करण्यात आली आहे. - नेहरू रस्त्यावर वाहने अप्सरा चित्रपटगृह ते प्रिन्स हॉटेल या दरम्यानच्या रस्त्यावर अप्सरा चित्रपटगृहाच्या बाजूने लावावीत. - चिमाजीअप्पा पेशवे पथावर कॅनॉलच्या पुढे मित्रमंडळ चौकापर्यंत पाटील प्लाझाच्या डाव्या बाजूला तसेच सावरकर पुतळा चौकापासून सिंहगड रस्त्यावर सारसबागेसमोरच्या बाजूस वाहने लावावीत. - संगम पूल येथील राजा बदादूर मिल रस्त्यावर गुन्हे अन्वेषण कार्यालय (सीआयडी) ते प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) येथे दोन्ही बाजूस तसेच एसएसपीएमएस मैदानाच्या बाजूसही वाहने लावता येणार आहेत. - एस. एम. जोशी पुलाजवळ गरवारे महाविद्यालयाच्या मागील बाजूस तसेच ठोसरपागेसमोरील रक्तपेढी रस्ता येथे वाहने लावता येतील. - बाबा भिडे पुलाच्या दोन्ही बाजूस नदीपात्रातील मोकळ्या जागेत वाहने लावण्याची सोय करण्यात आली आहे. गणेशोत्सवामध्ये वाहतूक कोंडीची समस्या टाळून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी केले आहे. तात्पुरते नो पार्किंग गणेशोत्सवामध्ये नागरिकांची होणारी गर्दी ध्यानात घेऊन डेक्कन परिसरातील काही रस्त्यांवर रविवापर्यंत (२७ सप्टेंबर) रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नो पार्किंग करण्यात येत आहे. मॅकडोनाल्ड ते खंडुजीबाबा चौक, खंडुजीबाबा चौक ते नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक (गुडलक चौक), खंडुजीबाबा चौक ते यशवंतराव चव्हाण पूल आणि शेलारमामा चौक ते सह्य़ाद्री हॉस्पिटल चौक या मार्गावर तात्पुरते नो पार्किग करण्यात आले आहे. या वाहतूक बदलांचा अवलंब करून नागरिकांनी सहकार्य करावे. गणेशोत्सवातील पार्किंगची ठिकाणे - विमलाबाई गरवारे महाविद्यालय - पुलाची वाडी, नदीकिनारी - दारुवाला पूल ते खडीचे मैदान - काँग्रेस भवन - व्होल्गा चौक ते मित्रमंडळ चौक - बालभवनसमोर (बजाज पुतळा ते सणस प्लाझा चौक उजवी बाजू) - एच. व्ही. देसाई महाविद्यालय - पूरम चौक ते हॉटेल विश्व (रस्त्याची डावी बाजू) - गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस - सर्कस मैदान - टिळक पूल ते भिडे पूल (नदीकिनारी) - हमालवाडा पार्किंग (नारायण पेठ)