पिंपरी-चिंचवडमध्ये अनौपचारिक गप्पांमध्ये पार्थ अजित पवार यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तर दिली. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्याविषयी देखील त्यांनी उल्लेख केला. बारणे यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर काहीही सांगितलं असलं तरी मी त्यांचं काम केलं आहे. हे त्यांच्या मुलाला माहीत आहे. असं पार्थ पवार यांनी सांगितलं. मावळमधून संजोग वाघेरे पुढे होते. बारणे निवडून येतील अशी परिस्थिती नव्हती, असे म्हणायला पार्थ पवार विसरले नाहीत. पार्थ पवार म्हणाले, पिंपरी- चिंचवड शहरात आधीपासूनच सक्रिय होतो. पक्षाचे अनेक जण सोडून गेले आहेत. लोक आपल्या सोबत आहेत की नाही, याची पाहणी करतो आहे, असे पार्थ पवार म्हणाले. पुढे ते म्हणाले, शहराध्यक्ष पदाबाबत अजित पवार हे अंतिम निर्णय घेतील. पण आमच्यासाठी पक्षातील सर्व वरिष्ठ नेते शहराध्यक्षच आहेत. यावर अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे निर्णय घेतील. शहराला राज्यपाल नियुक्त आमदार मिळावा ही माझी इच्छा आहे. पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा पूर्वीचा बालेकिल्ला आहे. मला आमदार किंवा खासदार व्हायचं नाही. पक्षवाढीसाठी प्रयत्न करायचे आहे. हेही वाचा - शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २६ कोटी ४१ लाखांची फसवणूक, निवृत्त लष्करी जवानासह सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल बारामतीमधून युगेंद्र पवार यांना साहेब उभं करणार आहे. अजित गव्हाणे यांनी चुकीचा निर्णय घेतला आहे. ते निवडून येतील असे मला वाटत नाही. पिंपरी विधानसभेतून अण्णा बनसोडे हेच उमेदवार असतील. पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत, असे पार्थ पवार म्हणाले. हेही वाचा - मोठी बातमी : विधानसभेला बारामतीत अजित पवार आणि युगेंद्र पवारांमध्ये लढत होणार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी या पत्रकारांच्या अनौपचारिक गप्पांचे नियोजन केलं होतं. यावेळी राष्ट्रवादीचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.