लोणावळ्यात वधूपक्षाच्या खोलीतून पावणेसतरा लाखांचे दागिने लंपास

वधूपक्षाच्या खोलीतून चोरटय़ांनी हिरेजडीत सोन्याचे दगिने, हार असा १६ लाख ८५ हजारांचा ऐवज ठेवलेली बॅग लांबविली.

Theft,Tahsildars house, dhule,marathi news, marathi
प्रातिनिधीक छायाचित्र

वधूपक्षाच्या खोलीतून चोरटय़ांनी हिरेजडीत सोन्याचे दगिने, हार असा १६ लाख ८५ हजारांचा ऐवज ठेवलेली बॅग लांबविली. लोणावळ्यातील बीजीज हिल रिट्रीट रिसॉर्ट हॉटेलमध्ये शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली.
सुनिता संजय जैन (वय ४८, रा.पॅरेडाईज अपार्टमेंट, अंधेरी, ए.व्ही रस्ता, मुंबई) यांनी यासंदर्भात लोणावळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुनिता जैन यांच्या नातेवाइकांचा विवाह तुंगार्ली येथील बीजीज हिल रिट्रीट रिसॉर्टमध्ये होता. सुनिता यांनी वधूचे दागिने हॉटेलमधील खोलीत ठेवले होते. हिरेजडीत नेकलेस, कर्णफुले, सोन्याची माळ, साखळी, अंगठी, बांगडी आणि ६५ हजारांची रोकड एका बॅगेत ठेवली होती. शुक्रवारी मध्यरात्री चोरटा वधूपक्षाच्या खोलीत शिरला. दागिने ठेवलेली बॅग लांबवून चोरटा पसार झाला. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
या घटनेची माहिती मिळताच लोणावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील यांनी तेथे भेट दिली. चोरटा माहीतगार असल्याचा संशय पोलीस निरीक्षक पाटील यांनी व्यक्त केला. उपनिरीक्षक नीलेश अपसुंदे तपास करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Party room ornaments theft bride lonavala crime police