लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पारपत्र (पासपोर्ट) काढण्याची प्रक्रिया अधिकाधिक वेगवान करण्यासाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय आणि पारपत्र कार्यालयाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. तत्काळ पारपत्र काढण्याची प्रक्रिया अधिक वेगवान करण्यासाठी पारपत्रासाठी अर्ज करून मुलाखतीची वेळ घेतलेले अर्जदार आपली मुलाखतीची वेळ बदलून लवकरची वेळ घेऊ शकतात, अशी माहिती पारपत्र कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
fake documents for passport
पारपत्रासाठी बनावट कागदपत्र देणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल
millions of old vehicles running on pune road no re registration after fifteen years
पुण्यातील रस्त्यावर लाखभर जुनी वाहने! पंधरा वर्षे होऊनही पुनर्नोंदणी नाही
How much tax will be paid on the gift of 240 crores given by Narayan Murthy to his grandson
Money Mantra: नारायण मूर्तींनी नातवाला दिलेल्या २४० कोटींच्या भेटीवर किती टॅक्स बसणार?

पारपत्राची तातडीने गरज असलेल्या अर्जदारांना तसेच नियमित प्रक्रियेद्वारे अर्ज करणाऱ्यांनाही अधिकाधिक लवकर पारपत्र मिळावे यासाठी पारपत्र कार्यालयाने या वर्षाच्या सुरुवातीला दररोज घेतल्या जाणाऱ्या मुलाखतींची संख्या १०० वरून २०० वर नेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तत्काळ पारपत्र मिळवणे सहज शक्य झाले आहे. मात्र, ही प्रक्रिया अधिक वेगवान करण्यासाठी तत्काळ योजनेतील पारपत्र मुलाखतींच्या उपलब्ध वेळा १२ वाजता आणि नियमित प्रक्रियेतील उपलब्ध वेळा साडेआठ वाजता जारी केल्या जातात. त्याद्वारे अर्जदार नवीन आणि आधीची वेळ (प्रीपोन करून) घेऊ शकतात अशी माहिती पुणे क्षेत्रीय पारपत्र कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे. पारपत्र मुलाखतीची वेळ ही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर दिली जाते. मुलाखतीची वेळ बदलून घेताना (प्रीपोन करताना) अर्जदार स्वत:च पूर्वी मिळालेली मुलाखतीची वेळ सोडण्याची तयारी दर्शवत असतो, अशा वेळी नवीन मिळणारी वेळ पूर्वीच्या वेळेनंतरची असण्याचा धोका संभवतो, असेही पारपत्र कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा- पुणे: ‘हरित भक्ती मार्गा’ची नितीन गडकरींकडून हवाई पाहणी

सुविधा असली तरी जोखीमही

पुणे क्षेत्रीय पारपत्र कार्यालयाचे क्षेत्रीय पारपत्र अधिकारी डॉ. अर्जुन देवरे म्हणाले,की १३ मार्चला पारपत्र मुलाखतीसाठी अर्ज करणाऱ्याला तत्काळ प्रक्रियेतून २० मार्चची वेळ मिळालेली असते. ती वेळ पुनर्निर्धारित करण्याचा प्रयत्न सदर अर्जदार करत असतानाच अनेक अर्जदार तसा प्रयत्न करत असतील तर सदर अर्जदाराच्या हातून २० मार्चची वेळ गेली आणि नवीन वेळ २७ मार्चची मिळाली असे होणे शक्य आहे. त्यामुळे एकदा मिळालेली वेळ बदलण्यात जोखीम आहे.

आणखी वाचा- हिंसा हाच हिंदू धर्माचा आधार, कालीचरण महाराज यांच्याकडून हिंसेचं उघड समर्थन

पारपत्र प्रक्रिया वेगवान

पारपत्र मुलाखतींची वाढवलेली संख्या, सोपी आणि वेगवान प्रक्रिया यांमुळे पारपत्र कार्यालयाच्या कार्यक्षमतेत झालेली वाढही मोठी आहे. २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये पुणे क्षेत्रीय पारपत्र कार्यालयाने एक लाख १३ हजार म्हणजे ५० टक्के अधिक पारपत्रे दिली. २०२२ च्या पहिल्या दोन महिन्यांच्या तुलनेत २०२३ च्या पहिल्या दोन महिन्यांत पुणे क्षेत्रीय पारपत्र कार्यालयाने २९ हजार अधिक पारपत्र दिली आहेत.