पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे मावळातील पवना धरण पूर्णपणे भरले आहे. त्यामुळे मावळसह शहरवासियांची पुढील वर्षभराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पवना धरणक्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. परिणामी, धरण काठोकाठ भरले आहे. पाण्याची तीव्र टंचाई जाणवेल म्हणून काही दिवसांपूर्वी पाटबंधारे विभागाच्या आदेशानुसार दुसऱ्यांदा पाणीकपात करण्याच्या तयारीत असलेल्या पिंपरी पालिकेने शहराच्या पाण्याची चिंता मिटल्याने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

water supply has been restored but complaints of water shortage are still continue
पिंपरी : पाणीपुरवठा पूर्ववत, मात्र तक्रारींचा ओघ
Why three new swimming pools will start in Mumbai How to plan the municipal corporation
पाण्याचा तुटवडा, तरीही मुंबईत तीन नवे जलतरण तलाव का सुरू होणार? महापालिकेचे नियोजन कसे?
Nighoje bandhara Leakage Leads to Water Shortage in Pimpri
पिंपरी : निघोजे बंधाऱ्याला गळती…पिंपरी-चिंचवडमधील समाविष्ट गावांत पाण्याचा प्रश्न
water storage in balkawadi dam
सातारा : बलकवडीचा जलसाठा तळाशी; धरणात फक्त २२ टक्के मृत पाणीसाठा

हेही वाचा – पुणे : लक्ष्मी रस्त्यावर व्यावसायिकाला लुटले

पिंपरी-चिंचवड शहरात नोव्हेंबर २०१९ पासून ‘दिवसाआड एकवेळ’, अशाप्रकारची पाणीकपात सुरू आहे. त्यात आणखी पाणीकपात करावी लागेल, अशी परिस्थिती काही दिवसांपूर्वी होती. पवना धरणातील पाणीसाठा खूपच कमी झाला होता. त्याची दखल घेऊन पाटबंधारे विभागाने महापालिकेला पत्र पाठवून आणखी काटकसरीने करण्याची आणी मोठी पाणीकपात करण्याची स्पष्ट सूचना केली होती. त्यादृष्टीने आणखी पाणीकपात करण्याच्या दृष्टीने पालिकेने हालचाली सुरू केल्या. तथापि, ऑगस्ट महिना सुरू झाल्यानंतर धरण क्षेत्रात सातत्याने पाऊस सुरू झाला. पवना धरण पूर्णपणे भरल्याने शहराची पुढील वर्षभराची पाण्याची चिंता मिटली असून नागरिकांमध्ये तसेच शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.