पिंपरी : शहराचा विस्तार वाढत असल्याने महापालिकेच्या वतीने पिंपरीतील गांधीनगरसमोरील महिंद्रा कंपनीच्या जागेत मध्यवर्ती अग्निशमन मुख्यालय उभारण्यात येणार आहे. त्यात आठ मजली प्रबोधिनी इमारत, १५ मजली निवासी इमारत, २२ अग्निशमन बंब बसतील असे वाहनतळ, अग्निशमन कार्यालय व कार्यशाळा, संग्रहालय व प्रेक्षागृह असणार आहे. यासाठी १२६ कोटी २४ लाख ३० हजार २७३ रुपये खर्च करण्यात येणार असून, कामाची ३० महिने मुदत आहे.

अग्निशमन विभागाचे मध्यवर्ती मुख्यालय सद्यस्थितीत संत तुकारामनगर येथे आहे. तेथील जागा अपुरी पडत असल्याने नव्या प्रशस्त ठिकाणी मुख्यालय बांधण्याचे नियोजन होते. गांधीनगर येथील महिंद्रा कंपनीकडून ‘आयटूआर’ अंतर्गत मिळालेल्या ५.५ एकर जागेत हे मुख्यालय बांधण्यात येणार आहे. त्या जागेत आठमजली प्रबोधिनी इमारत उभारली जाणार आहे. तिथे फायरमन व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर, अग्निशमन विभागात काम करणारे फायरमन, जवान, चालक व इतर कर्मचारी यांच्यासाठी १५ मजली निवासी इमारत बांधण्यात येणार आहे.

Municipal Corporation issues notice to 32 private hospitals in Ahilyanagar city
अहिल्यानगर शहरातील ३२ खासगी रुग्णालयांना महापालिकेची नोटीस
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Class 12th exams begin at 51 centers in the district 40 bharari squads
जिल्ह्यात ५१ केंद्रावर बारावी परीक्षा सुरु, ४० भरारी पथके
transport and commercial complex will be set up on site of Dahisar Zakat Station on Western Expressway
मुंबई महानगरपालिका वर्षभरात २५ ‘आपला दवाखाना’ सुरू करणार
Forest dept probes elephant procession in Pirangut
आमदाराची हत्तीवरून मिरवणूक कार्यकर्त्यांना महागात; संयोजकासह सांगलीच्या श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षावर गुन्हा
controversy over dhirendra shastri moksha remark
उलटा चष्मा:मोक्ष मिळवून दिला जाईल!
Navi Mumbai , Science Center ,
नवी मुंबई : शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या विज्ञान केंद्राचे ९० टक्के काम पूर्णत्वास
Mumbai City District Planning Committee meeting in the presence of Eknath Shinde
६९० कोटींच्या आराखड्यास मान्यता; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची बैठक

२२ अग्निशमन बंब उभे करता येतील, असे प्रशस्त वाहनतळ असणार आहे. तसेच, अग्निशमन कार्यालय व कार्यशाळा असणार आहे. अग्निशमन संग्रहालय, दोनशे जणांच्या आसन क्षमतेचे प्रेक्षागृह, ५० आसन क्षमतेची सेमिनार खोली, १०० प्रशिक्षणार्थी व ११८ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था असणार आहे. तसेच, कवायत करण्यासाठी मैदान असणार आहे. इतर वाहनांसाठी दोन मजली वाहन व्यवस्था असल्याचे स्थापत्य प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.

या प्रकल्पासाठी स्थापत्य प्रकल्प विभागाने १५० कोटी ९१ लाख ८२ हजार १७५ रुपये खर्चाची निविदा काढली होती. त्यात ११ ठेकेदारांनी सहभाग घेतला. त्यापैकी आठ ठेकेदार पात्र ठरले. त्यातील बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लि.ची १२६ कोटी २४ लाख ३० हजार खर्चाची निविदा स्वीकृत करण्यात आली आहे. १६.४० टक्के कमी दराची निविदा असल्याने शिर्के कन्स्ट्रक्शनकडून १३ कोटी ३० लाख रुपये अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम जमा करून घेण्यात आले आहेत. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहरासाठी मध्यवर्ती अग्निशमन मुख्यालयाची गरज होती. त्या दृष्टीने सर्व सुविधांयुक्त मुख्यालय उभारण्यात येणार आहे. मुख्यालयाद्वारे शहर परिसरातील अग्निशमन सेवेची कार्यक्षमता व प्रशिक्षणाचा दर्जा उंचावणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले.

Story img Loader