पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखलीतील कुदळवाडी परिसरात अनधिकृत धार्मिकस्थळांच्या बांधकामांवर मंगळवारी मध्यरात्री कारवाई केली जात असताना जमावाने कारवाईला विरोध करीत पोलिसांवर दगडफेक केली. याप्रकरणी पोलिसांनी ३३ जणांना अटक केली असून, तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ३३ जणांना अटक करण्यात आली आहे, तर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. महापालिकेने मंगळवारी पहाटे चिखली – कुदळवाडी आणि पवार वस्ती परिसरातील अनधिकृत धार्मिकस्थळांवर अतिक्रमण कारवाई सुरू केली. त्याला विरोध करण्यासाठी सुमारे ५०० जणांचा जमाव रस्त्यावर उतरला.
त्यांनी पोलिसांच्या व्हॅनवर व कर्मचार्‍यांवर दगडफेक केली. यात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सात अधिकारी, कर्मचार्‍यांसह राज्य राखीव पोलीस दलाचे १३ जवान जखमी झाले. पोलीस निरीक्षक अमोल फडतरे तपास करीत आहेत.

अटक केलेल्यांची यादी

याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोविंदराव गोमारे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नाजीम नईम चौधरी (२६), इजाज वकार चौधरी (२६), मोहम्मद उस्मान हुसेन इंद्रिसी (२६), अब्दुल रहमान सरवर अली इंद्रसी (२६), आजम फकरूद्दीन रज्जाक (१९), मोहम्मद आसीफ हबीबूर रेहमान इंद्रिसी (१८), नसरूद्दीन अब्दुल हमीद सिद्धीकी (२०), रफिक शकिल शेख (३५), शाही आलम अफजल सिद्धीकी (२४), साहिल अन्सारी शेख (३०), गुलाम हुसैन मैनुल्लाह खान (१९), निजाम हुसैन नायाब हुसैन सिद्धीकी (२२), अब्दुल करीम अली मुल्ला चौधरी (३५), रामदेव परमात्मा प्रताप पांडे (४८), फैजन नियाल चौधरी (२६), युसूफ खुर्शिद आलम चौधरी (२३), अकदस बरकत अली खान (१८), अब्बु सोफिया चौधरी (३२), नसिम अहम्मद इंद्रिसी (१९), मोहम्मद नवाज मोहम्मद अली खान (३४), कयामुद्दीन सिराजउद्दीन चौधरी (२२), मोहम्मद कासिम मेहफूज अलम चौधरी (२४), फय्यज फत्तेह खान (वय २८), मकसूद मंजूर चौधरी (२१), मेहफूज मंजुर चौधरी (२६), आकाश रामविलास सूर्यवंशी (२१), जुनेद मज्जीद बेग (२०), मुराद मजीद बेग (३४), आरिफ वासउली इंद्रिसी (३८), अभिनंदन निरजकुमार यादव (१८), इलियास बासु तांबोळी (४४), शादाब नौशाद मोमीन (३३), शाबाद मोहम्मद सय्यद (३१) यांच्यासह तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.