पिंपरी: पाणीपुरवठा विभागाच्या देखभालीच्या कामाची कार्यरंभ आदेशाची (वर्क ऑर्डर) फाईल तयार करण्यासाठी एक लाखाची लाच घेतल्याप्रकरणी अटक झालेला अनुरेखक दिलीप आडे याला महापालिका सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तसेच आडे याची विभागीय चौकशी करण्याचे आदेशही महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी  दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा व जलनिःसारण विभागात दिलीप भावसिंग आडे हा अनुरेखक (लिपिक) या पदावर काम करत होता. आडे याने एका ठेकेदाराला मंजूर निविदेच्या कामाची वर्क ऑर्डर देण्यासाठी एक लाख पाच हजार रूपयांची लाच मागितली. तडजोडीअंती एक लाखांची रोकड घेताना आडेला २१ मार्चला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पालिकेत रंगेहाथ पकडले होते. त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटकही करण्यात आली आहे. त्यानंतर शुक्रवारी आडेला पालिका सेवेतून निलंबित करून विभागीय चौकशीचे आदेश आयुक्त सिंह यांनी दिले आहेत. या आदेशाची आडेच्या सेवा नोंद पुस्तकात नोंदही करावी, असेही आदेशात म्हटले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pcmc clerk arrested for accepting rs 1 lakh bribe suspended pune print news ccp 14 zws
First published on: 25-03-2023 at 05:38 IST