पिंपरी : पिंपरी महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह शहरातील नागरिक; तसेच अभ्यागतांना आठवड्यातील तीनच दिवस भेटणार आहेत. सोमवार, बुधवार व शुक्रवारी दुपारी तीन ते सहा या वेळेत आयुक्त भेटीसाठी उपलब्ध असणार आहेत. महापालिकेशी संबंधित कामकाजाकरिता मुख्य प्रशासकीय कार्यालयात दररोज नागरिक येत असतात. हेही वाचा : पुण्यातील हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेच्या कामाला वेग त्याचप्रमाणे, आयुक्तांना भेटण्यासाठी अभ्यागत येत असतात. आयुक्तांकडे सध्या विस्तृत स्वरूपाचे कामकाज आहे. विविध विषयांवर त्यांच्या सतत बैठका सुरू असतात. कामाच्या व्यग्रतेमुळे आयुक्तांना भेटीसाठी वेळ देता येत नाही. त्यामुळे भेटू इच्छिणाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी आयुक्तांनी आठवड्यातील तीन दिवस भेटीसाठी निश्चित केले आहेत. त्यानुसार, प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी दुपारी तीन ते सहा या वेळेत आयुक्त नागरिकांना भेटणार आहेत. त्यातही महत्त्वाचे काम निघाल्यास आयुक्त भेटीसाठी उपलब्ध होऊ शकणार नाहीत, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.