scorecardresearch

PCMC election 2017: पिंपरी चिंचवडमध्ये पती-पत्नी विक्रमी मताधिक्याने विजयी

एकाच प्रभागात ६ काटे आडनावाच्या व्यक्तींनी निवडणूक लढवली होती.

PCMC election 2017: पिंपरी चिंचवडमध्ये पती-पत्नी विक्रमी मताधिक्याने विजयी
शीतल काटे आणि नाना उर्फ विठ्ठल काटे

पिंपरी चिंचवडमध्ये प्रभाग क्रमांक २८ मधून पती-पत्नीचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि शीतल काटे यांचा विक्रमी मताधिक्याने विजय झाला आहे. नाना काटे हे ५,१६७ मतांनी विजयी झाले तर शीतल काटे या ४,१०१ मतांनी विजयी झाल्या आहेत.

२०१२ मध्ये विक्रमी मताधिक्याने जिंकलेले दोन्ही उमेदवार या वेळी देखील मोठ्या फरकाने जिंकले आहेत. पिंपळे-सौदागर-रहाटणी प्रभागातील शीतल काटे आणि शत्रुघ्न काटे यांचा विजय झाला आहे. एकाच पॅनेलमधून तीन काटे हे विजयी झाले आहेत.

नाना आणि शीतल काटे हे दोघे पती-पत्नी आहेत. त्या दोघांनाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली होती. २०१२ च्या निवडणुकीमध्ये ८,००० मतांनी जिंकलेले शत्रुघ्न काटे या वेळी देखील विक्रमी मताधिक्याने जिंकले आहेत. मागील वेळी राष्ट्रवादीकडून उभे राहिलेले शत्रुघ्न काटे हे यावेळी भारतीय जनता पक्षाकडून उभे राहिले होते. यावेळी त्यांचा ७,४७१ मतांनी विजयी झाले आहेत.

विठ्ठल उर्फ नाना काटे हे ५,१०७ मतांनी विजयी ठरले आहेत. याच प्रभागातील चौथ्या विजयी उमेदवार आहेत, निर्मला कुटे. त्या ५७९ मतांनी विजयी झाल्या आहेत. त्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आहेत.

निवडणुकीपूर्वीच नाना काटे हे तगडे उमेदवार समजले जात होते. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते लक्ष्मण जगताप विरोधात लढले होते. प्रभाग क्रमांक २८ मध्ये एकूण सहा काटे आडनावाचे उमेदवार उभे होते. त्यापैकी तीन जण विजयी झाले आहे. दोन उमेदवार भाजपकडून तर दोन उमेदवार राष्ट्रवादीकडून विजयी झाले आहेत. काटे शत्रुघ्न सिताराम (अ) भारतीय जनता पार्टी, काटे शितल विठ्ठल (राष्ट्रवादी) काटे जयनाथ नारायण (भाजप) काटे विठ्ठल कृष्णाजी(राष्ट्रवादी), अनिता संदिप काटे       (राष्ट्रवादी), मिनाक्षी अनिल काटे (शिवसेना) हे उमेदवार प्रभाग क्रमांक २८ मध्ये उभे होते.

हिंजवडी आणि आयटी पार्क या भागामध्ये आपल्याला महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करायचे आहे. महिला सुरक्षेला प्राधान्य राहील असे नाना काटे यांनी याआधी म्हटले होते. तर, पायाभूत सुविधांचा विकास करणे हे आपले उद्दिष्ट असेल असे शत्रुघ्न काटे यांनी म्हटले होते.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-02-2017 at 14:11 IST

संबंधित बातम्या