कोथरुड परिसरात पादचाऱ्याचा मोबाइल हिसकावला

कोथरुड परिसरात पादचारी तरुणाचा मोबाइल संच दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली.

कोथरुड परिसरात पादचाऱ्याचा मोबाइल हिसकावला
कोथरुड परिसरात पादचाऱ्याचा मोबाइल हिसकावला

पुणे : कोथरुड परिसरात पादचारी तरुणाचा मोबाइल संच दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. पवन लुगुन (वय २४, सध्या रा. बावधन) याने या संदर्भात कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पवन बांधकाम मजूर आहे. तो कोथरुडमधील एमएनजीएल पंपाजवळून दुपारी जात होता. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्याला अडवले. बांधकाम मजुरी करतो का?. आमच्याकडे बांधकामाचे काम आहे, अशी बतावणी चोरट्यांनी केली. चोरट्यांनी पवनकडे त्याचा मोबाइल क्रमांक मागितला. पवनने चोरट्यांना मोबाइल क्रमांक दिला. त्या वेळी चोरट्यांनी त्याच्या हातातील मोबाइल संच हिसकावून पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक पी. व्ही. कुलकर्णी तपास करत आहेत. शहरात गेल्या काही महिन्यांपासून पादचाऱ्यांचे मोबाइल संच हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मोबाइल हिसकावण्याच्या दररोज तीन ते चार घटना वेगवेगळ्या भागात घडतात.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pedestrian mobile stolen thieves grabbed police pune print news ysh

Next Story
‘ईडी’सरकारने अब्दुल सत्तारांना शिक्षणमंत्री करावं – राष्ट्रवादी काँग्रेसचं पुण्यात आंदोलन
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी