लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : वाहनचालक उपस्थित असताना ‘नो-पार्किंग’ किंवा ‘राँग पार्किंग’ची कारवाई केल्यास, त्याच्याकडून गाडी ओढून नेण्याचा (टोइंग) दंड आता घेता येणार नाही. नियमबाह्य पार्किंगवर कारवाई कशी करायची, याबाबत पुणाच्या पोलीस आयुक्तांनी मार्गदर्शक सूचनाच जारी केल्या असून, त्यामध्ये ही स्पष्टता आणली आहे.

rumor, Vishal Agarwal absconding, pimpri chinchwad police, porsche car accident
विशाल अगरवाल पोलिसांच्या ताब्यातून फरार? पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला खूलासा…
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
What Kiran mane Said About Ketki Chitale?
केतकी चितळेला किरण मानेंचा सवाल, “अभिमानाने ‘चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’ जात सांगणारी ताई आता हिंदू..”
Pune Girl Dangerous Bike Ride Video
पुण्याच्या १.६ मिलियन फॉलोअर्स असलेल्या तरुणीचा वादग्रस्त Video पाहून भडकली जनता; मोहोळ, फडणवीसांसह फोटो चर्चेत
Car Sales Drop in May 2024
देशातील बाजारात ‘या’ २ कारकडे ग्राहकांनी फिरवली पाठ; ३० दिवसात फक्त ४ लोकांनी केली खरेदी

बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईसाठी ‘टोइंग व्हॅन’चा वापर करण्यात येतो. गाड्या ओढून नेण्याचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. प्रत्यक्ष कारवाई करताना ‘टोइंग व्हॅन’वरील कामगार वाहनचालकांशी अरेरावी करतात, अशा तक्रारी पोलीस आयुक्तांकडे करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी परिपत्रक जारी केले. पोलीस आयुक्तालयात टोइंग करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी, कर्मचाऱ्यांची बैठक आयोजिण्यात आली होती. या बैठकीत पोलीस आयुक्तांनी मार्गदर्शक सूचना दिल्या.

आणखी वाचा-सगेसोयऱ्यांना आरक्षण न्यायालयात टिकणार नाही! ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा दावा

या सूचनांनुसार, वाहन चुकीच्या ठिकाणी वा पद्धतीने लावल्याबद्दल होणाऱ्या कारवाईच्या वेळी वाहनचालक उपस्थित असल्यास त्याच्याकडून गाडी ओढून नेण्याचा (टोइंग व्हॅन) खर्च घेण्यात येऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अनेक वाहनचालकांना सम-विषम दिनांक पद्धत माहिती नसते. काहीजण बाहेरगावाहून येतात. त्यामुळेही पार्किंगबाबत माहिती नसते. अशा वेळी वाहनचालक कारवाईच्या वेळी उपस्थित असूनदेखील चुकीच्या पद्धतीने गाडी लावण्यासाठी केलेल्या कारवाईबरोबरच टोइंग व्हॅनचा दंडही वाहनचालकाकडून आकारला जातो. आता याला आळा बसेल. शिवाय, सम-विषम दिनांक विचारात न घेता वाहन लावल्याचे आढळून आल्यास टोइंग व्हॅनमधील पोलीस कर्मचाऱ्यांनी याबाबतची घोषणा ध्वनीक्षेपकाद्वारे करावी, अशीही सूचना करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी ई-चलन यंत्र आणि वॉकीटॉकी बाळगावी, असेही निर्देश या बैठकीत पोलीस आयुक्तांनी दिले.

आणखी वाचा-सकाळी नऊपूर्वी भरणाऱ्या शाळांवर छडी… आता काय होणार?

नो-पार्किंग दंड (टोईंग चार्जसह)

वाहन प्रकारदंड जीएसटीसहटोईंग चार्जएकूण दंड
दुचाकी ५०० रुपये२८५ रुपये७८५ रुपये
चारचाकी ५०० रुपये५७१ रुपये१ हजार ७१ रुपये