पुणे : सोमवारी दिवसभरात जिल्ह्यातील १८७ जणांना करोना संसर्गाचे निदान झाले आहे. राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाने याबाबत माहिती दिली. मात्र, बहुसंख्य करोना रुग्णांना सौम्य लक्षणे असून ते घरच्या घरी बरे होत असल्याने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सोमवारी दिवसभरात आढळलेल्या १८७ नवीन रुग्णांपैकी ८१ रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रात आहेत. ४९ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात, तर ५७ रुग्ण जिल्ह्याच्या उर्वरित भागात आढळले आहेत. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी विशेषत: जोखीम गटातील रुग्ण, सहव्याधीग्रस्त आणि ज्येष्ठ नागरिकांनी तसेच लसीकरण न झालेल्या नागरिकांनी मुखपट्टी वापरासह सर्व आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सोमवारी आढळलेल्या १८७ नव्या रुग्णांमुळे पुणे जिल्ह्यातील एकूण करोना रुग्णसंख्या १४ लाख ८७ हजार ९८५ एवढी झाली आहे. ३७३७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Average temperature in Thane district at 42 degrees Celsius
मंगळवार ठरला उष्णवार! ठाणे जिल्ह्यात सरासरी तापमान ४२ अंश सेल्सियसवर
heatwave in mumbai and thane mumbai
मुंबई, ठाण्यात उष्णतेची लाट
Who is throwing stones at houses since a month
अद्भूत! एक महिन्यापासून घरांवर दगडफेक, कोण करतंय?
Mild earthquake tremors in Akola district
अकोला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य हादरे