लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्याविषयी प्रचंड नाराजी असल्याचे सांगून शिवसेनेने पिंपरी विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. त्यातच भाजपनेही पिंपरीत कमळावर लढणारा उमेदवार पाहिजे अशी मागणी केली आहे. त्यामुळे आमदार बनसोडे यांच्या अडचणीत भर पडली असून, पिंपरीच्या जागेवरून महायुतीतच रस्सीखेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Ramdas Athawales message of unity to Advocate prakash ambedkar
रामदास आठवलेंकडून ॲड.आंबेडकरांना पुन्हा ऐक्याची साद; म्हणाले, ‘आपण दोघेही नरेंद्र मोदींच्या..’
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
Kishore Jorgewar expressed his displeasure with Sudhir Mungantiwar front of Devendra Fadnavis
थेट फडणवीसांसमोरच जोरगेवारांनी व्यक्त केली मुनगंटीवारांवर जाहीर नाराजी… म्हणाले, “मला उमेदवारी मिळू नये म्हणून…”
Assembly Elections 2024 Akkalkuwa-Akrani Assembly Constituency Congress
लक्षवेधी लढत: अक्कलकुवा: लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढणार का?
maharashtra assembly election 2024 rohit pawar s reply to mahesh landge in bhosari assembly constituency
पिंपरी : धमक्या देऊ नका, आम्ही राजकारणात गोट्या खेळण्यास आलो नाहीत; रोहित पवार यांचे महेश लांडगे यांना प्रत्युत्तर
Sharad Pawar, Sudhir Kothari Hinganghat,
वर्धा : अखेर शरद पवार थेट ‘हिंगणघाटच्या शरद पवारां’च्या घरी, म्हणाले…

शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन मतदारसंघापैकी पिंपरी अनुसूचित जातींसाठी (एससी) राखीव आहे. २००९ च्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे तर, २०१४ मध्ये शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार निवडून आले. २०१९ मध्ये पुन्हा बनसोडे राष्ट्रवादीकडून निवडून आले. पक्षातील फुटीनंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. ‘ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला जागा’ असे महायुतीचे सूत्र ठरल्याचे सांगितले जात असल्याने बनसोडे यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. परंतु, शिवसेनेने पिंपरीवर दावा सांगितला. त्यामुळे बनसोडे यांच्या अडचणीत भर पडली आहे.’ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकजण इच्छुक आहेत. आमदार अण्णा बनसोडे यांच्याविषयी प्रचंड नाराजी आहे. महायुतीसाठी प्रत्येक जागा महत्त्वाची आहे.

आणखी वाचा-अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या तरुणाचा कर्वेनगरमध्ये खून

महायुतीचा एकही आमदार कमी होऊ नये, यासाठी पिंपरी मतदारसंघ शिवसेनेला मिळावा अशी आमची भूमिका आहे. शिवसेनेचा उमेदवार विजयी होईल. पिंपरीत पूर्वी शिवसेनेचा आमदार होता. लोकसभेला निर्णायक मते मिळाली आहेत. हा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे. या जागेची मागणी करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सूचित केले आहे,’ असे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.

महायुतीच्या बैठकीत राष्ट्रवादीला जागा सुटली. तर, शिवसेना प्रामाणिकपणे प्रचार करणार आहे. लोकसभेला सेनापती एकीकडे आणि सैन्य दुसरीकडे असे राष्ट्रवादीकडून घडले. परंतु, विधानसभेला शिवसेनेकडून तसे होणार नाही. महायुतीचा धर्म पाळला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यावर आमदार बनसोडे म्हणाले, की शिवसेनेने दावा करणे उचित असून, तो त्यांचा अधिकार आहे. परंतु, महायुतीत ठरल्याप्रमाणे जागा राष्ट्रवादीलाच सुटणार असून मीच लढणार आहे. माझ्याबाबत नाराजी असल्याचे खासदार बारणे यांचे वैयक्तिक मत आहे.