पालिकेच्या वाहनांमध्ये इंधन भरण्याकरीता आता पेट्रोकार्ड कॅशलेस सुविधा; राज्यातील पहिलीच महापालिका असल्याचा दावा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध कार्यालयीन कामकाजासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांमध्ये इंधन भरण्याकरीता आता ‘पेट्रोकार्ड कॅशलेस’ सुविधा सुरु करण्यात आली आहे.

pimpri petrocard
पालिकेच्या वाहनांमध्ये इंधन भरण्याकरीता आता पेट्रोकार्ड कॅशलेस सुविधा

पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध कार्यालयीन कामकाजासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांमध्ये इंधन भरण्याकरीता आता ‘पेट्रोकार्ड कॅशलेस’ सुविधा सुरु करण्यात आली आहे. बँक ऑफ बडोदाच्या वतीने असे कार्ड महापालिका वाहन चालकांना दिले जाणार आहे. अशाप्रकारची सुविधा देणारी पिंपरी चिंचवड ही राज्यातील पहिली महापालिका असल्याचा दावा करण्यात आला आहे.

महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. मुख्य प्रशासकीय इमारतीत आयुक्तांच्या हस्ते वाहनचालक सुखदेव भोईटे यांना कार्ड देण्यात आले. बँक ऑफ बडोदाचे शाखा व्यवस्थापक अतुल चव्हाण, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम आदी उपस्थित होते.

आयुक्त पाटील म्हणाले, प्रशासकीय कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना जलदगतीने सेवा सुविधा देण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. प्रशासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी पारदर्शक कामकाजाच्या दृष्टीने महापालिकेने संगणक प्रणालीचा अधिकाधिक वापर कामकाजात सुरु केला आहे. आर्थिक व्यवहार हा कॅशलेस असावा त्यादृष्टीने पेट्रोकार्ड सुविधा सुरु करून महापालिकेने कॅशलेस आर्थिक व्यवहार करण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल टाकले आहे.

बँक ऑफ बडोदाकडून वाहन इंधनाकरीता महापालिकेच्या विविध विभागांना प्रिपेड कार्डची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. संबंधित विभागाच्या आवश्यकतेनुसार खर्च मर्यादा देण्यात येणार आहे. विभागांनी प्रिपेड कार्ड सुविधा मिळण्याकरीता लेखा विभागाकडे विभागाचा अर्ज आणि बँकेकडील नमुन्यातील प्रिपेड कार्ड अर्ज भरून सादर करण्याबाबत आयुक्तांनी सर्व विभागांना यापूर्वीच परिपत्रकाद्वारे कळविले होते. त्यानुसार संबंधित विभागांना आता प्रिपेड कार्डचा वापर पेट्रोल पंपावर वाहन इंधन भरण्यासाठी करता येणार आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Petrocard cashless facility refueling municipal vehicles claims first municipal corporation state pune print news ysh

Next Story
पालकांची आर्थिक लूट करणाऱ्या शाळांवर कारवाईची मागणी; रयत विद्यार्थी विचार मंचाकडून महापालिकेला निवेदन
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी