पुणे : पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील वाढ गेल्या नऊ दिवसांपासूनच सुरूच असून, या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलचे दर लिटरमागे सुमारे सहा रुपयांनी वाढले आहेत. नव्या दरानुसार पुण्यात पेट्रोल ११५.३६ रुपये, तर डिझेलचा दर ९८.११ रुपये लिटर झाला आहे.

इंधनाची शेवटची दरवाढ नोव्हेंबर २०२१ मध्ये झाली होती. केंद्र शासनाकडून करण्यात आलेल्या कर कपातीनंतर ४ नोव्हेंबरला पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले होते. ४ नोव्हेंबरला पुणे शहरात पेट्रोलचे दर प्रतिलिटर १०९ रुपये ५० पैसे, तर डिझेलचे दर ९२ रुपये ५० पैसे होते. २२ मार्चला सुमारे पाच महिन्यांनंतर त्यात वाढ सुरू झाली. २२ मार्चला पेट्रोल ११० रुपये ३५ पैसे तर डिझेल ९३ रुपये १४ पैसे लिटर झाले होते. २२ मार्चपासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. २२ मार्चपासून ३० मार्चपर्यंत पेट्रोल, डिझेलच्या दरांत सहा ते सात वेळा वाढ नोंदविण्यात आली. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुमारे सहा रुपयांनी वाढ झाली.

Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर
रेल्वे सुसाट…! गेल्या वर्षभरात साडेपाच कोटी प्रवासी अन् फुकट्या प्रवाशांना २७ कोटींचा दंड
Navi Mumbai Municipal Corporation, Achieves, Record Property Tax, Collection, 716 Crore , financial year, 2023-2024,
नवी मुंबईत ७१७ कोटी मालमत्ता कर जमा, गतवर्षीपेक्षा ८३.६६ कोटी जास्त करवसुलीचा दावा
Panvel Municipal Corporation
एका दिवसांत तीन कोटींहून अधिक कर जमा, पनवेल महापालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत ३३३ कोटी रुपये

शहरात पॉवर पेट्रोलही महागले असून या इंधनाच्या दरात गेल्या नऊ दिवसांत सहा रुपयांहून अधिकची वाढ झाली आहे. २१ मार्चपर्यंत पॉवर पेट्रोल ११३ रुपये ५० पैसे लिटर होते, ते आता ११९ रुपये ८७ पैसे लिटर झाले आहे. सीएनजीचे दर स्थिर असून, किलोमागे या इंधनाचा दर ६६ रुपये आहे. ऑल इंडिया पेट्रोल डीलर असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी इंधनाच्या नव्या दरांची माहिती दिली.

नऊ दिवसांतील दरवाढ (लिटर)

२१ मार्च २६ मार्च

पेट्रोल १०९.५० रु.       ११५.३६ रु.

डिझेल  ९२.५० रु.       ९८.११ रु.

पॉवर ११३.५० रु.        ११९.३६ रु.