यादीसाठी छायाचित्र देण्याचे निवडणूक शाखेचे आवाहन; नाव वगळण्याचा इशारा

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या निवडणुका पुढील वर्षी फे ब्रुवारी महिन्यात होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेने मतदार यादी अद्ययावत करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांनी छायाचित्र देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील एकू ण २१ विधानसभा मतदार संघांमधील तब्बल दोन लाख ९९ हजार ३९ मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत नसल्याने संबंधित मतदारांनी त्यांचे छायाचित्र न दिल्यास त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हे मतदार महापालिका निवडणुकीतील मतदानाला मुकण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक शाखेकडून मतदार यादी अद्ययावत के ली जात आहे. प्रारूप मतदार यादी १ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध के ली जाणार आहे. मतदार यादीत नाव आहे किं वा कसे, हे  www.nvsp.in या संकेतस्थळावर किं वा ‘वोटर्स हेल्पलाइन’ या मोबाइल उपयोजनवर (अ‍ॅप) समजेल. मतदार यादीत छायाचित्र नसल्यास याच संके तस्थळावर किं वा वोटर्स हेल्पलाइन अ‍ॅपवर अर्ज क्र. आठ भरावा, मतदार नोंदणीसाठी अर्ज क्र. सहा, तर वगळण्यासाठी अर्ज क्र. सात भरावा असे आवाहन निवडणूक शाखेकडून करण्यात आले आहे.    दरम्यान, शहरातील वडगाव शेरी मतदार संघातील ६८ हजार १५४, शिवाजीनगर २१ हजार ९१३, कोथरूड ४४ हजार ६२३, खडकवासला ३२ हजार १२३, पर्वती १८ हजार चार, हडपसर ४१ हजार ४०४, पुणे कॅ न्टोन्मेंट २४ हजार ७३२ आणि कसबा पेठ मतदार संघातील ९८७३ अशा शहरातील

एकूण आठ मतदार संघांमध्ये दोन लाख ६० हजार ८२६ मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत नाही.  पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड मतदार संघातील ५७६६, पिंपरी दहा हजार ५३४ आणि भोसरी मतदार संघातील १७६० अशा तीन मतदार संघातील १८ हजार ६० मतदारांचे छायाचित्र अद्ययावत करण्यात आलेले नाही. ग्रामीण भागातील जुन्नर विधानसभा मतदार संघातील शून्य, आंबेगाव नऊ, खेड-आळंदी शून्य, शिरूर ८२७८, दौंड ५२८९, इंदापूर १२८६, बारामती शून्य, पुरंदर ४३३३, भोर ८३१ आणि मावळ मतदार संघातील १२७ अशा दहा विधानसभा मतदार संघातील २० हजार १५३ जणांचे छायाचित्र मतदार यादीत नाही.

मतदार यादीमध्ये छायाचित्रासह नाव कसे शोधाल?

http://www.nvsp.in  (एनव्हीएसपी) या संकेतस्थळावर जाऊन, त्यावर ‘सर्च इन इलेक्टोरल रोल’ या पर्यायात गेल्यानंतर मतदाराने आपले नाव, वडील किं वा पतीचे नाव, आडनाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ ही माहिती भरावी. त्यानंतर संबंधित मतदाराचे नाव यादीमध्ये आहे किं वा कसे?, तसेच छायाचित्र आहे किंवा कसे हे समजू शके ल. याशिवाय के ंद्रीय निवडणूक आयोगाकडून ‘व्होटर हेल्पलाइन’ नावाचे मोबाइल उपयोजन उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावर देखील एनव्हीएसपी संके तस्थळाप्रमाणेच मतदाराने स्वत:ची माहिती भरल्यानंतर मतदार यादीत छायाचित्रासह नाव आहे किं वा कसे हे समजणार आहे.