scorecardresearch

पिंपरी भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर, ‘यांना’ मिळाली संधी

पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी अखेर दोन महिन्यांनी जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे.

BJP Pune
शंकर जगताप यांची १९ जुलै रोजी शहराध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. दोन महिन्यांनी त्यांनी जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे.(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी अखेर दोन महिन्यांनी जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. महिला शहराध्यक्षपदी माजी नगरसेविका सुजाता पालांडे, तर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी माजी उपमहापौर तुषार हिंगे यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारीणीत दहा उपाध्यक्ष तर सहा सरचिटणीस आहेत.

Love to eat peanut Chiki Viral video from factory think 100 times before eating it
शेंगदाण्याची चिक्की खायला आवडते का? फॅक्टरीमधील व्हायरल व्हिडीओ पाहून चिक्की खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
sharad pawar (6)
येत्या १५-२० दिवसांत शरद पवार भाजपाला पाठिंबा देणार? काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचं स्पष्ट विधान, म्हणाल्या…
eknath shinde bjp flag
“…अन्यथा भाजपात प्रवेश केला असता”, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

शंकर जगताप यांची १९ जुलै रोजी शहराध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. दोन महिन्यांनी त्यांनी जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. कार्यकारिणीवर जगताप यांच्यासह विधानपरिषद आमदार उमा खापरे यांचे वर्चस्व दिसून येत आहे. माजी शहराध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे समर्थक कार्यकारिणीत दिसून येत नाहीत.

आणखी वाचा-प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त उद्या पुण्याच्या मध्यभागातील वाहतुकीत बदल… जाणून घ्या पर्यायी व्यवस्था

वरिष्ठ उपाध्यक्ष, पक्ष प्रवक्तेपदी राजू दुर्गे , उपाध्यक्ष माऊली थोरात, रवींद्र देशपांडे, विनोद मालू, विशाल कलाटे, सिद्धेश्वर बारणे, बिभीषण चौधरी, पोपट हजारे, बाळासाहेब भुंबे, आशा काळे यांची नियुक्ती झाली आहे. सरचिटणीसपदी संजय मंगोडेकर, अजय पाताडे, शैला मोळक, शीतल शिंदे, माजी सभागृह नेते नामदेव ढाके, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चिटणीसपदी मधुकर बच्चे, राजश्री जायभाय, गीता महेंद्रू, विजय शिनकर, सागर फुगे, कविता भोंगाळे, हिरेन सोनावणे देवदत्त लांडे, विशाल वाळुंजकर, महेंद्र बाविस्कर, कोषाध्यक्षपदी संतोष निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध सेलचे अध्यक्षही जाहीर केले आहेत. त्याचबरोबर ६४ जणांना कार्यकारिणी सदस्य म्हणून संधी देण्यात आली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pimpri bjp jumbo executive announced pune print news ggy 03 mrj

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×