पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जबरदस्तीने वर्गणी मागणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. या अगोदर अनेकांना अशा प्रकरणात बेड्या ठोकल्याचा उल्लेख करत तंबी दिली आहे. नियमांच्या चौकटीत राहून गणेश उत्सव साजरा करण्याच आवाहन त्यांनी गणेश मंडळांना केले आहे. ते लोकसत्ता ऑनलाइनशी बोलत होते. 

यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे म्हणाले की, “ गणेश मंडळासोबत आमची बैठक झाली आहे. गणपती उत्सव नियमात राहून साजरा करावा. गणपती मंडळांना आवाहन आहे की गणपती उत्सव साजरा करत असताना खंडणीचे गुन्हे काही व्यक्तींवर दाखल झालेले आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करून बेड्या देखील ठोकल्या आहेत. माझी अशी विनंती आहे सणाला गालबोट न लावता, वर्गणी जबरदस्तीने मागू नये, तस केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.”

गर्दीच्या नियोजनासाठी ड्रोनचा वापर करणार –

तसेच, “रेकॉर्डवरील गुन्हेगारांनावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गणेश उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करू. गणपती उत्सवात गर्दीच्या नियोजनासाठी ड्रोनचा वापर करणार आहोत. शिवाय, महानगर पालिकेच्या सीसीटीव्हीचा वापर देखील करणार आहोत. असं पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी म्हटलं आहे.”

Story img Loader