पुणे: भरधाव वेगातील बाईकचा अपघात; बाईकस्वार तरुण-तरुणीचा मृत्यू; घटनाक्रम CCTV मध्ये कैद

हा अपघात इतका गंभीर होता की अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला. अनेकजण अपघात झाल्यानंतर घटनास्थळी धावत जात असल्याचं दिसतंय.

CCTV
संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये झाला कैद

पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये जुन्या मुंबई पुणे महामार्गावर पुण्याहुन मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर आकुर्डी येथे एक भीषण अपघात झालाय. भरधाव आलेली दुचाकी डिव्हायडरला धडकल्याने झालेल्या अपघातात बाईकवरील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका गंभीर होता की अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला. या घटनेत दुचाकीवरील आर्यन परमार आणि श्वेता गजबे यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

दरम्यान, आज पहाटे साडेपाचच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरही एक भीषण अपघात झाला ज्यात तीन जणांचा जागील मृत्यू झाला. या विचित्र अपघातामध्ये सहा गाड्या एकमेकांना धडल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pimpri chinchwad bike accident on old mumbai pune road cctv video kjp scsg

Next Story
राज्याला वीज टंचाई भासणार नाही- पवार