पिंपरी- चिंचवड: पिंपरी- चिंचवडमध्ये बांधकाम व्यवसायिकाला बांधकाम पाडण्याची धमकी देऊन पन्नास हजार उकळणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्यांसह युट्युब पत्रकार म्हणवणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरटीआय कार्यकर्ता राजू मारीमुत्तु, युट्युब पत्रकार चंद्रशेखर पात्रे, रामदास ताठे आणि बाबू टेकल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप देहुरोड पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या नाहीत. पोलीस आरोपी फरार होण्याची वाट पाहत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेबाबत मिंकू म्हल्होत्रा यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सविस्तर माहिती अशी की, बांधकाम व्यवसायिक मिंकू यांचं जुना पुणे- मुंबई महामार्ग देहूरोड येथे वडिलोपार्जित घर आहे. त्याची दुरुस्ती सुरू आहे. याबाबत मिंकू यांनी कॅन्टोन्मेंट ला पत्र देऊन माहिती दिली होती. दरम्यान, हेच हेरून आरटीआय कार्यकर्ता राजू मारीमुत्तु याने काही युट्युब पत्रकारांना सोबत घेऊन मिंकू यांना बांधकाम पाडण्याबाबत धमकी दिली. कॅन्टोन्मेंट येथे तक्रार करण्यात येईल अशी माहिती मित्राकडे देण्यात आली. आरटीआय कार्यकर्ता राजू ला समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, तो ऐकण्याच्या मनस्थिती नव्हता. युट्युब पत्रकार चंद्रशेखर पात्रे, ताटे, बाबू टेकल यांनी मिंकू यांच्या घरच शूटिंग केलं. त्याच दिवशी ६ जून रोजी रात्री आरटीआय कार्यकर्ता राजू हा मिंकू यांच्या मित्राच्या ऑफिसमध्ये गेला. तिथे त्याने पैशांची मागणी केली. देहूरोड येथील इतर दोघांकडून बांधकाम पाडण्याची तक्रार न देण्यासाठी प्रत्येकी एक लाख घेतल्याचं सांगत तू पन्नास हजार दे अशी मागणी केली. अस तक्रारीत म्हटलं आहे. पैसे घेत असताना आरटीआय कार्यकर्त्यांचा मिंकू यांनी व्हिडिओ काढला आहे. पैसे घेत असताना आरटीआय कार्यकर्ता स्पष्ट दिसत आहे. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अखेर या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, अद्याप पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही. अद्याप ही देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

पैसे घेताना असा काढला व्हिडिओ

आरटीआय कार्यकर्ता राजू मारीमुत्तु आणि मिंकू मल्होत्रा यांच्यासह मित्राच्या ऑफिसमध्ये बसले होते. तिथं त्यांच्यात बोलणं झालं. अखेर ५० हजार रुपये आरटीआय कार्यकर्ता राजू मारीमुत्तुने मागितले. हे पैसे घेत असताना आरटीआय कार्यकर्ता राजू मारीमुत्तू कैद झाला. पैसे घेत असताना राजू मारी मुत्तू हा कॅमेरे कडे बघत असल्याचे देखील व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. या घटनेनंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

“देहू पालखी मार्गाची पाहणी करत आहोत. आम्ही त्यामध्ये व्यस्त आहोत. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. लवकर अटक करू” – विक्रम बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, देहूरोड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.