पिंपरी – चिंचवड : शादी डॉट कॉम वेबसाईटवरून तरुणीशी संपर्क साधून लग्नाच अमिश दाखवून ३ करोड १६ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींना पिंपरी- चिंचवडच्या सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रणजीत मुन्नालाल यादव, सिकंदर मुन्ना खान आणि बबलू रघुवीर यादव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अद्याप मुख्य आरोपी फरार आहे. फसवणूक झालेल्या तरुणीकडून ८१ बँक खात्यावर पैसे घेतल्याचे पोलीस तपासात उघड झाल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्चशिक्षित असलेली तरुणी शादी डॉट कॉम संकेतस्थळावरून विवाहासाठी मुलगा शोधत होती. तेव्हा, अज्ञात आरोपी आणि तिची ओळख झाली. परदेशात नामांकित कंपनीत सीईओ असल्याचं तरुणीला सांगण्यात आलं. फसवणूक झालेल्या उच्चशिक्षित तरुणीचा देखील विश्वास बसला. त्यांचं व्हाट्सअप कॉल वरून दररोज बोलणं सुरू झालं. ते एकमेकांच्या अधिक जवळ आले. दोघांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचं ठरवलं होतं. याचा फायदा आरोपीने घेतला.

अज्ञात आरोपीने आजारपणाचे आणि लोकांकडून घेतलेल्या कर्ज फेडीचे आणि विविध करणे देऊन २०२३ ते २०२४ दरम्यान उच्चशिक्षित तरुणीकडून तब्बल ३ करोड १६ लाख रुपये घेतल्याचे पोलीस तपासात समोर आल. हे करोडो रुपये आरोपीने वेगवेगळ्या ८१ बँक खात्यावर घेतले होते. पैकी, ११ बँक खाते हे एकाच पत्त्यावरील होते. पैकी हे पैसे ज्या व्यक्तींच्या बँक खात्यात आले, त्या तिघांना पिंपरी- चिंचवडच्या सायबर पोलिसांनी दिल्ली हरियाणा बॉर्डरवरून बेड्या ठोकल्या आहेत. हे तिघे तरुणीची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीच्या संपर्कात होते. असं पोलीस तपासात समोर आल आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तरुणीची फसवणूक करणारा अज्ञात आरोपी आणि बेड्या ठोकण्यात आलेला रणजीत, सिकंदर आणि बबलू हे इंस्टाग्राम कॉल च्या माध्यमातून संपर्कात होते. बबलू हा मुख्य आरोपीच्या सांगण्यावरून एटीएम मधून पैसे काढून त्याला द्यायचा. या प्रकरणात आत्तापर्यंत ३०० ते ४०० बँक खात्याची पडताळणी करण्यात आलेली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांच्या पथकाने केली आहे.