पत्नीला अश्लील शिवीगाळ केल्याने मित्राची हत्या केल्याची घटना घडली आहे. पिंपरी- चिंचवडच्या गुंडा विरोधी पथकाने आरोपीला अटक केली आहे. केतन निवृत्ती कोंढाळकर वय- २८ असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. संदीप उर्फ दशरथ देशमाने वय- २५ असे हत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. संदीपने केतनच्या डोक्यात सिमेंटच्या गट्टूने घाव घालून हत्या केली.

हेही वाचा – पुणे : जादूटोण्याची भीती दाखवून महिलेकडून खंडणी उकळली; उत्तर प्रदेशातील भोंदूविरुद्ध गुन्हा दाखल

हेही वाचा – आधी कर्तव्य मतदानाचे…गर्भवती महिलेचे रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी मतदान

शहरातील मोशी भागात अनोळखी व्यक्तीची हत्या झाल्याचं समोर आलं होतं. एमआयडीसी भोसरी पोलीस आणि गुंडा विरोधी पथक आरोपींचा शोध घेत होत. याच दरम्यान हत्या झालेल्या तरुणाचे नाव हे केतन निवृत्ती कोंढाळकर असल्याचं निष्पन्न झाले. दिवसभर तो कोणाशी बोलला याच तांत्रिक विश्लेषण करून गुंडा विरोधी पथक आरोपीपर्यंत पोहोचले. आरोपी संदीप उर्फ दशरथ देशमानेला थेरगाव येथील मैत्रिणीच्या घरातून अटक केली. आरोपी संदीपकडे पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीत हत्या झालेल्या केतन कोंढाळकर याने संदीपच्या पत्नीला अश्लील शिवीगाळ केली होती. याच रागातून संदीपने केतनची डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून जीवे ठार मारले. या सर्व घटनेप्रकरणी आरोपी संदीपच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात २४६/२०२४ भा.द.वी.कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.