प्रियकर सतत मानसिक त्रास देत असल्याने प्रेयसीने मित्रांच्या मदतीने हत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. या प्रकरणी गुंडाविरोधी पथकाने या कटात सहभागी असलेल्या तिघांसह महिलेला आणि अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतलं आहे. बालाजी उर्फ बाळू मचक लांडे असे हत्या करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. रेखा विश्वंभर भातनासे असे आरोपी प्रेयसीचे नाव आहे. तिच्या अल्पवयीन मुलीला देखील हत्येप्रकरणी आरोपी करण्यात आलं आहे. आधी हे हत्या प्रकरण अपघात आहे असा बनवा रचण्यात आला होता. पण गुंडाविरोधी पथकामुळे आरोपींचा बनाव उघड झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या बालाजीचा अपघात झाल्याचा बनाव रचून त्याला वासीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. दरम्यान, आरोपी रिक्षाचालक दिनेश सूर्यकांत उपादे, आदित्य शरद शिंदे यांच्यासह इतरांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बनावट नाव सांगितली होती. ही बाब लक्षात येताच पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी समांतर तपास करण्याबाबत सूचना दिल्या. गुंडाविरोधी पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी आजूबाजूचे अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तोच धागा चिखलीतील दुर्वांकुर सोसायटीपर्यंत पोहोचला. सोसायटीच्या लिफ्टमध्ये काही रक्ताचे डाग देखील आढळले. पोलिसांचा संशय आणखीनच बळावला. फ्लॅट नंबर ३०३ मध्ये अल्पवयीन मुलगी दिसली. तिला पोलिसांनी विश्वासात घेऊन मृत्यू झालेल्या व्यक्तीचा फोटो दाखवला आणि ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याचे नाव बालाजी उर्फ बाळू मचक लांडे असे असल्याचं समोर आलं आणि तो बीडमधील दिंदृडचा रहिवाशी असल्याचं तपासात पुढे आल. तसेच मुलीची आई रेखा विश्वभंर भातनासे आणि इतर चार साथीदारांनी हत्या केली असल्याचे देखील कबूल केलं. रिक्षाचालक दिनेश सूर्यकांत उपादे, आदित्य शरद शिंदे यांना ताब्यात घेतलं असून इतर तीन आरोपी फरार आहेत त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची एक टीम बीडला रवाना झाली आहे.

Vikas Walkar Shraddha Walkar father death
श्रद्धा वालकरच्या अस्थिविसर्जनाचे कार्य अधुरेच राहिले, वडिल विकास वालकर यांनी घेतला जगाचा निरोप
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Crime News
Navi Mumbai Crime : प्रियकराने प्रेयसीच्या गळ्यावर चाकूचे वार करत केली हत्या, धक्कादायक घटनेने पनवेल हादरलं
Satara , Mother, conspired, boyfriend, murder,
सातारा : आईने प्रियकरासोबत मुलाच्या हत्येचा रचलेला कट उधळला
Crime News
Kolkata Crime : वडिलांच्या प्रेयसीची अल्पवयीन मुलाकडून हत्या, बापाचे विवाहबाह्य संबंध शोधण्यासाठी केला GPS चा वापर
Pune Municipal Corporation contract employee stabbed to death over immoral relationship in Kothrud
कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात
Amravati , Murder , immoral relationship,
अमरावती : अनैतिक संबंधातून हत्‍या, अपघाताचा बनाव
36 year old man from Pimplegurav died due to GBS complications and pneumonia
पिंपरी : ‘जीबीएस’मुळे युवकाचा मृत्यू

हेही वाचा – पुण्यात दुर्मीळ ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ विकाराची बाधा कशामुळे? रुग्णांच्या तपासणीतून कारण आलं समोर…

हेही वाचा – राजस्थानातील एकाकडून २२ लाख रुपयांची अफू जप्त

प्रेयसीने असा रचला हत्येचा कट…

दिनांक १७ जानेवारी रात्री पावणेनऊ वाजता. प्रेयसी रेखाने बालाजीच्या हत्येचा कट रचला. आधीच रुमध्ये काही मित्रांना बोलवण्यात आलं. तिथं बालाजी येताच त्याच्या डोक्यात आणि पायावर लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केलं. अपघात असल्याचा बनाव रचून त्याला वायसीयम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारापूर्वीच बालाजीचा मृत्यू झाला. अखेर पोलिस मूळ सूत्रधार असलेल्या रेखापर्यंत पोहोचले आणि घटनेचे बिंग फुटलं. प्रियकर बालाजी हा मानसिक त्रास देत असल्याने रेखाने हत्या केली असल्याचे गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी सांगितलं आहे.

Story img Loader