नाना पटोलेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर टीका करताना भाजपाच्या महिला महापौरांची जीभही घसरली; काँग्रेसने नोंदवला आक्षेप

त्यांनी नाना पटोले यांच्या फलकावरील फोटोला जोडे मारून निषेध नोंदवला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी नावाच्या व्यक्ती बद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी चांगलंच राजकारण तापलं आहे. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पटोले यांचा चांगलाच समाचार घेतलाय. त्यांनी पटोले यांना एकेरी भाषा वापरत वाभाडे काढले आहेत. “पटोले यांना डांबरी रस्त्यावर आणून तुडवून काढू, त्याला त्याची जागा दाखवू,” अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केलाय. यावेळी, त्यांनी नाना पटोले यांच्या फलकावरील फोटोला जोडे मारून निषेध नोंदवला. 

यावेळी महापौर माई ढोरे म्हणाल्या की, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेले भाष्य हे निंदनीय आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांना एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलणं शोभत नाही. त्यांना मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीची किंमत कळत नसेल तर ते काँग्रेसचे अध्यक्ष करण्याच्या लायकीचे नाहीत. काँग्रेस पक्ष अशा नालायक लोकांना अध्यक्ष करून माणसाच्या अंगावर कुत्र्यासारखे सोडत असतील, तर ते अशोभनीय आहे,” अशी टीका त्यांनी काँग्रेसवर केली आहे.

“जे मोदी फसवणूक करुन या देशातून पळाले त्याबद्दल..”; मोदींवरील वक्तव्यानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

पुढे त्या म्हणाल्या की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबद्दल अशी भाषा पटोले करत असतील तर समोर त्यांनी समोर यावं, पुरुष नकोत, आम्ही महिलाच बास झालोत. त्याला डांबरी रस्त्यावर तुडवून काढू, त्याला त्याची जागा दाखवू,” असा एकेरी उल्लेख करत त्यांनी संताप व्यक्त केला. 

महापौरांची भाषा अशोभनीय- काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम

“महापौर माई ढोरे यांची भाषा अशोभनीय आहे. त्या शहराच्या प्रथम नागरिक आहेत. त्यांना ही भाषा शोधत नाही. अगोदर त्यांनी नाना पटोले यांनी केलेल्या व्यक्तव्याबद्दल नीट माहिती घ्यावी. मग, त्यांनी भाष्य करावे. नाना पटोले यांनी मोदी नावाच्या गावगुंडाबद्दल भाष्य केले आहे. महापौर म्हणून त्यांचा आम्हाला आदर आहे. पण, असे वक्तव्य करत असतील तर त्यांचा निषेध करतो,” असं काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना म्हणाले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pimpri chinchwad mayor usha dhore slams nana patole over his remark on pm modi kjp 91 hrc

Next Story
पुणे: त्याच्या मोबाईलमध्ये सापडले ४० हजार Porn Videos; ओळखीच्या महिलांचे फोटो मॉर्फ करुन तयार करायचा अश्लील व्हिडीओ
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी