पिंपरी : पिंपरी-चिंचवडसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या औद्योगिक शहरामध्ये प्रदूषणाच्या समस्येवर प्रभावी नियंत्रण ठेवणे ही काळाची गरज आहे. ‘लो इमिशन झोन्स’सारख्या संकल्पना केवळ पर्यावरणपूरक नसून, त्या शाश्वत नागरी जीवनशैलीच्या दिशेने उचलेले एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

वाहतूक क्षेत्रातील वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि हरित उपक्रमांना चालना देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ब्रिटिश उच्च उपायुक्त मुंबई तसेच ट्रान्सपोर्ट फॉर लंडन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचा समारोप आयुक्त सिंह यांच्या प्रमुख उपस्थित झाला, यावेळी ते बोलत होते.

आयुक्त सिंह म्हणाले, ‘या कार्यशाळेच्या माध्यमातून तांत्रिक सुसज्जता, सामाजिक सहभाग आणि प्रशासकीय समन्वय या तिन्ही पैलूंवर विचारमंथन झाले. चर्चेतील निष्कर्ष हे शहराच्या प्रदूषण नियंत्रण धोरणांना अधिक बळकट करतील. हवेतील प्रदूषणाचे कमी उत्सर्जन क्षेत्रे योजनेचे नियोजन करताना त्यामध्ये विविध घटकांचा, विभागाचा सहभाग कसा सुनिश्चित करायचा, यावर चर्चा झाली. यात वाहतूक सेवा पुरवठादार, व्यापारी, उद्योजक, नागरिक, शासकीय यंत्रणा आदी सर्व संबंधित हितधारकांचा अभ्यास व समावेश यावर मार्गदर्शन करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कमी उत्सर्जन क्षेत्रे याबाबत कसे जागरूक करायचे, जनजागृतीसाठी कोणते उपाय योजावेत आणि वर्तन बदल कसा घडवून आणता येईल, यावर विशेष भर देण्यात आला. पर्यावरणपूरक चालणे आणि सायकल वापरास प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र पादचारी मार्ग व सायकल मार्ग उभारण्यासाठी भर देण्यावर चर्चा झाली.’