PCMC New Zonal Offices List: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासनिक कामकाजाची कार्यक्षमता वाढविणे, नागरिकांना अधिक सुलभ व तत्पर सेवा उपलब्ध करून देणे तसेच वाढती लोकसंख्या व वाढलेला भौगोलिक कार्यक्षेत्राचा विस्तार विचारात घेता महानगरपालिकेच्या विद्यमान ८ प्रभाग समित्यांचे (क्षेत्रीय कार्यालये) पुनर्रचना करून एकूण १० प्रभाग समित्या (क्षेत्रीय कार्यालये) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने आदेश जारी करण्यात आला आहे. प्रभाग समित्यांचे कार्यालयांना किल्ल्यांचे नाव देखील देण्यात आले आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २९-अ मध्ये लोकसंख्येच्या प्रमाणानुसार प्रभाग समित्यांची स्थापना करण्याचे प्रावधान आहे. त्या अनुषंगाने प्रशासनिक सोयीसाठी व नागरिकाभिमुख सेवा अधिक परिणामकारकपणे देण्यासाठी महानगरपालिकेच्या विद्यमान ८ प्रभाग समित्यांचे पुनर्रचना करून एकूण १० प्रभाग समित्या स्थापन करण्याबाबत १३ मार्च २०२६ रोजी झालेल्या महापालिका सभेत निर्णय घेण्यात आलेला होता. त्यानुसार प्रभाग समित्यांचे पुनर्रचना करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ अन्वये ३२ निवडणूक प्रभागांची विभागणीदेखील प्रभागनिहाय करण्यात आली आहे.

प्रभाग समित्यांच्या पुनर्रचनेबाबतचा निर्णय २५ मे २०२६ पासून लागू होणार आहे, असेदेखील आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

क्षेत्रीय कार्यालयपत्ताअंतर्गत येणारे प्रभाग क्रमांक
अ क्षेत्रीय कार्यालय (राजगड)संत ज्ञानेश्वर चौक, निगडी प्राधिकरण, निगडी ४११०४४१३, १४ व १५
ब क्षेत्रीय कार्यालय (सिंहगड)लिंक रोड, एल प्रो कंपनी आवार, चिंचवडगाव ४११०३३१७, १८ व १९
क क्षेत्रीय कार्यालय (विजयदुर्ग)हॉकी स्टेडियम शेजारी, नेहरूनगर, भोसरी ४११०२६२, ९ व १०
ड क्षेत्रीय कार्यालय (देवगिरी)औंध-रावेत रोड, रहाटणी ४११०१७२१, २७, २८ व २९
ई क्षेत्रीय कार्यालय (शिवनेरी)पांजरपोळ संस्थे समोर, नाशिक रोड, भोसरी ४११०३९३, ४ व ५
फ क्षेत्रीय कार्यालय (तोरणा)नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयाची जुनी इमारत, लोकमान्य टिळक चौक, निगडी ४११०४४१, ११ व १२
ग क्षेत्रीय कार्यालय (पुरंदर)नवीन प्रशासकीय इमारत, दिलीप वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमी मागे, थेरगाव, पुणे ४११०३३२२, २३ व २४
ह क्षेत्रीय कार्यालय (प्रतापगड)कासारवाडी येथील महिला आय.टी.आय इमारत३०, ३१ व ३२
ज क्षेत्रीय कार्यालय (रायगड)स. नं. २७, मनपा वाहनतळ इमारत, ताथवडे, पुणे ४११०३३१६, २५ व २६
ल क्षेत्रीय कार्यालय (लोहगड)म्हाडा, प्लॉट नं. ई-२, संत तुकाराम नगर, पोलिस स्टेशन समोर, पिंपरी पुणे ४११०१८६, ७, ८ व २०