पिंपरी : भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून सुरू झालेले रणकंदन, माजी नगरसेवकांची फोडाफोडी, स्थानिक-बाहेरचा वाद यामुळे भोसरीतील ११ प्रभागांमधील लढती लक्षवेधी ठरल्या आहेत. उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार आणि भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असून, भोसरीत अजितदादा आणि महेशदादांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

शहरी, गावठाण आणि ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या भोसरी मतदारसंघात ११ प्रभागांचा समावेश आहे. मागीलवेळी भोसरीतील पाच प्रभागातून भाजपचेच चारही नगरसेवक निवडून आले होते. भाजपचे एकूण ३२ नगरसेवक या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यापैकी आठ जणांनी पक्षांतर केले. प्रभाग क्रमांक १२ तळवडे गावठाण, रुपीनगरमधून चारही राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले होते. एकूण राष्ट्रवादीचे १० नगरसेवक निवडून आले होते. त्यातील तिघांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संपूर्ण प्रचाराचा रोख आमदार लांडगे यांच्याविरोधात आहे.

भ्रष्टाचार, दादागिरी, दहशत, स्थायी समिती अध्यक्षाला लाचप्रकरणात झालेली अटक आणि मालमत्ता कशी वाढली, असे म्हणत पवारांकडून आमदार लांडगे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. त्याला लांडगे यांच्याकडूनही तितक्याच आक्रमकपणे उत्तर देण्यात येत आहे. त्यामुळे भोसरीतील लढतींकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

प्रभाग २ मध्ये सारिका बोऱ्हाडे आणि अश्विनी जाधव, प्रभाग ५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपवासी झालेल्या अनुराधा गोफणे आणि भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या भीमाबाई फुगे या दोन माजी नगरसेविकांमध्ये लढत होत आहे. प्रभाग आठमध्ये भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांना भाजपकडून डॉ. सुहास कांबळे यांनी आव्हान दिले आहे. ही लढत आमदार लांडगे यांनी प्रतिष्ठेची केली आहे.

माजी आमदारांसमोर पुतण्याला निवडून आणण्याचे आव्हान

भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांचे पुतणे विराज लांडे हे प्रभाग ७ भोसरी गावठाणातून पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात भाजपकडून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संतोष लोंढे निवडणूक लढवत आहेत. लांडे यांच्या कुटुंबातील विराज एकमेव निवडणूक लढवत आहेत. विराज यांना निवडून आणण्याचे आव्हान माजी आमदार लांडे यांच्यासमोर असणार आहे.

दोन माजी महापौरांची निवडणूक चुरशीची

राहुल जाधव, नितीन काळजे हे दोन्ही माजी महापौर पुन्हा भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी आव्हान दिले आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी, सीमा सावळे, संतोष लोंढे हे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहे. येथील लढती चुरशीच्या झाल्या आहेत.

उबाळे यांच्या अस्तित्वाची लढाई

माजी विरोधी पक्षनेत्या, शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे निगडीतून रिंगणात उतरल्या आहेत. त्यांना मनसेच्या माजी नगरसेविका अश्विनी चिखले यांनी आव्हान दिले आहे. उबाळे यांचा विधानसभेला दोनवेळा आणि मागीलवेळी महापालिका निवडणुकीत पराभव झाला होता. यंदाची निवडणूक त्यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई आहे. याच प्रभागात मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले आणि माजी नगरसेविका अश्विनी चिखले हे पती-पत्नी निवडणूक लढवत आहेत.

अजित गव्हाणे रिंगणाबाहेर

विधानसभा निवडणूक लढलेले स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित गव्हाणे यांनी यंदा निवडणूक लढविण्याचे टाळले आहे. त्यांनी मागीलवेळी आमदार महेश लांडगे यांचे बंधू सचिन लांडगे यांचा पराभव केला होता. यंदा गव्हाणे यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला.

प्रभाग १ चिखली-म्हेत्रेवस्ती
अ : सुरेश म्हेत्रे (भाजप), विकास साने (राष्ट्रवादी काँग्रेस), विजय जरे (शिवसेना-ठाकरे)
ब : सोनम मोरे (भाजप), साधना काशिद (राष्ट्रवादी काँग्रेस)
क : शीतल यादव (भाजप), संगीता ताम्हाणे (राष्ट्रवादी काँग्रेस)
ड : गणेश मळेकर (भाजप), यश साने (राष्ट्रवादी काँग्रेस), राहुल भोसले (शिवसेना-ठाकरे)

प्रभाग २ बोऱ्हाडेवाडी-जाधववाडी
अ : नीलेश बोराटे (भाजप), रूपाली आल्हाट (राष्ट्रवादी काँग्रेस)
ब : सारिका बोऱ्हाडे (भाजप), अश्विनी जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस)
क: राहुल जाधव (भाजप), विशाल आहेर (राष्ट्रवादी काँग्रेस), रोहित जगताप (शिवसेना)
ड: निखिल बोऱ्हाडे (भाजप), वसंत बोराटे (राष्ट्रवादी काँग्रेस)

प्रभाग ३ चऱ्होली- चोविसावाडी
अ : सारिका गायकवाड (भाजप), अनुराधा साळुंके (राष्ट्रवादी काँग्रेस), गौरी नरसिंगे (काँग्रेस)
ब : नितीन काळजे (भाजप), प्रकाश आल्हाट (राष्ट्रवादी काँग्रेस)
क : अर्चना सस्ते (भाजप), पूनम तापकीर (राष्ट्रवादी काँग्रेस)
ड : सचिन तापकीर (भाजप), लक्ष्मण सस्ते (राष्ट्रवादी काँग्रेस)

प्रभाग ४ दिघी-बोपखेल
अ : श्रुती डोळस (भाजप), प्रतिभा दोरकर (राष्ट्रवादी काँग्रेस)
ब : कृष्णा सुरकुले (भाजप), मंगेश असवले (राष्ट्रवादी काँग्रेस)
क : हिराबाई घुले (भाजप), श्रद्धा अकुलवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
ड: उद्धव गायकवाड (भाजप), चंद्रकांत वाळके (राष्ट्रवादी काँग्रेस), मनीषा परांडे (शिवसेना)

प्रभाग ५ गवळीनगर-चक्रपाणी वसाहत
अ : अनुराधा गोफणे (भाजप), भीमाबाई फुगे (राष्ट्रवादी काँग्रेस)
ब : सागर गवळी (भाजप), अमर फुगे (राष्ट्रवादी काँग्रेस)
क : कविता भोंगाळे (भाजप), प्रियंका बारसे (राष्ट्रवादी काँग्रेस)
ड : जालिंदर शिंदे (भाजप), राहुल गवळी (राष्ट्रवादी काँग्रेस), दिलीप सावंत (शिवसेना-ठाकरे)

प्रभाग ६ धावडेवस्ती-भगतवस्ती
अ : रेखा देवकर (भाजप), इंदुबाई घनवट (राष्ट्रवादी काँग्रेस), वर्षा बढे (काँग्रेस)
ब : रवी लांडगे (भाजप-बिनविरोध)
क : राजश्री लांडगे (भाजप), प्रियंका लांडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
ड : योगेश लांडगे (भाजप), संतोष लांडगे (राष्ट्रवादी काँग्रेस)

प्रभाग ७ भोसरी गावठाण
अ : संतोष लोंढे (भाजप), विराज लांडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
ब: सोनाली गव्हाणे (भाजप), अनुराधा लांडगे (राष्ट्रवादी काँग्रेस)
क : राणी पठारे (भाजप), अश्विनी फुगे (राष्ट्रवादी काँग्रेस)
ड : नितीन लांडगे (भाजप), अमोल डोळस (राष्ट्रवादी काँग्रेस)

प्रभाग ८ इंद्रायणीनगर
अ : सुहास कांबळे (भाजप), सीमा सावळे (राष्ट्रवादी काँग्रेस), महेंद्र सरोदे (शिवसेना)
ब : नम्रता लोंढे (भाजप), राजश्री गागरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
क : नीलिमा लांडगे (भाजप), अश्विनी वाबळे (राष्ट्रवादी काँग्रेस)
ड: विलास मडिगेरी (भाजप), तुषार सहाणे (राष्ट्रवादी काँग्रेस)

प्रभाग ११ पूर्णानगर-घरकुल
अ : कुंदन गायकवाड (भाजप), मारुती जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस), अक्षय बोबडे (शिवसेना), विश्वास गजरमल (शिवसेना-ठाकरे)
ब : रिटा सानप (भाजप), मयूरी साने (राष्ट्रवादी काँग्रेस), ज्योती गोफणे (शिवसेना), मंगल सोनवणे (शिवसेना-ठाकरे)
क: योगिता नागरगोजे (भाजप), सत्यभामा नेवाळे (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रणिती बाबर (शिवसेना), मोहर कोकाटे (शिवसेना-ठाकरे) ड : नीलेश नेवाळे (भाजप), नारायण बहिरवाडे (राष्ट्रवादी काँग्रेस), काशिनाथ जगताप (शिवसेना-ठाकरे)

प्रभाग १२ तळवडे-रुपीनगर
अ : प्रवीण भालेकर (भाजप), शरद भालेकर (राष्ट्रवादी काँग्रेस), संदीप जाधव (शिवसेना)
ब : शीतल वर्णेकर (भाजप), चारुलता सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस)
क : शिवानी नरळे (भाजप), सीमा भालेकर (राष्ट्रवादी काँग्रेस)
ड : शांताराम भालेकर (भाजप), पंकज भालेकर (राष्ट्रवादी काँग्रेस)

प्रभाग १३ निगडी गावठाण-यमुनानगर
अ : अनिल घोलप (भाजप), तानाजी खाडे (राष्ट्रवादी काँग्रेस), रवींद्र खिलारे (शिवसेना-ठाकरे), शशिकिरण गवळी (मनसे)
ब : अर्चना करांडे (भाजप), प्रिया कोलते (राष्ट्रवादी काँग्रेस), शुभांगी बोऱ्हाडे (शिवसेना), संगीता पवार (शिवसेना-ठाकरे)
क : मनीषा कुलकर्णी (भाजप), सुलभा उबाळे (शिवसेना), अश्विनी चिखले (मनसे)
ड : उत्तम केंदळे (भाजप), संतोष कवडे (राष्ट्रवादी काँग्रेस), सचिन चिखले (मनसे) तानाजी शिंदे (शिवसेना), सतीश मरळ (शिवसेना-ठाकरे)