पिंपरी चिंचवड: नवी सांगवी येथे कारचालकाने श्वानास चिरडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना नवी सांगवीतील फेमस चौक येथे घडली. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सांगवी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन ढावळे असे श्वानाला चिरडणाऱ्या वाहनचालकाचे नाव आहे. घटने प्रकरणी कुणाल कामत यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

बुलढाणा अर्बन बँक फेमस चौक येथे एम.एच १२ व्ही.टी ०४४९ या नंबरच्या गाडीने फुटपाथ जवळ झोपलेल्या श्वानाला पाहून त्याच्या अंगावर गाडी घातली. पाठीमागे गाडी घेत असताना पुन्हा श्वानाच्या अंगावर गाडी घातली. अनेकांनी त्यांना सांगितले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. श्वान विव्हळत होता, गंभीर जखमी झालेला श्वान बेशुद्ध पडला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबतची माहिती श्वान प्रेमी कुणाल यांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन श्वानाला रुग्णालयात नेले. सध्या श्वानावर उंड्री येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सांगवी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस) २०२३ कलम ३२५, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० कलम ११(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.