पिंपरी-चिंचवड: नितीन गिलबिले हत्येप्रकरणी अमित पठारेला देखील पिंपरी- चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विक्रांत ठाकूर आणि अमित पठारेला ताब्यात घेतल्याने नीतीनच्या हत्येच कारण समोर येणार आहे.

दोन दिवसांपूर्वी नितीन गिलबिलेची वडमुखवडी अलंकापुरम रोड लगत फॉर्च्युनर गाडीत पिस्तूलातून गोळ्या घालून हत्या केली होती. हत्येनंतर आरोपी अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर दोघेही पसार झाले होते. अखेर त्यांना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. विक्रम ठाकूरला लोणावळा आणि अमित पठारेला वाघोलीतून ताब्यात घेण्यात आल आहे. प्लॉटींग आणि संपत्तीच्या वादातून हत्या केल्याचं प्रथमदर्शनी पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. आता दोघांना ताब्यात घेतल्यानंतर नितीन गिलबिलेच्या हत्येच गूढ समोर येईल. नेमकं कारण समोर येईल.

पिंपरी-चिंचवड पोलीस दोघांकडे कसून चौकशी करत आहेत. पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, मारुती जगताप, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी स्वप्नील लांडगे, योगेश नागरगोजे, सुधीर डोळस, नितीन लवटे यांच्या टीमने ही कारवाई केली आहे.