Pimpri-Chinchwad Police Commissionerates anti-gang squad has arrested seven accused in five different operations | Loksatta

पुणे: पिंपरी- चिंचवडमध्ये ३ पिस्तुलं, ११ जिवंत काडतुसे, ६ कोयते जप्त; सहा जणांना ठोकल्या बेड्या

या गुन्ह्यात अल्पवयीन मुलाचाही समावेश होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

पुणे: पिंपरी- चिंचवडमध्ये ३ पिस्तुलं, ११ जिवंत काडतुसे, ६ कोयते जप्त; सहा जणांना ठोकल्या बेड्या
पिंपरी चिंचवडमध्ये गुंडाविरोधी पथकाने केलेल्या पाच वेगवेगळ्या कारवाईत सात आरोपींना अटक

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुंडाविरोधी पथकाने केलेल्या वेगवेगळ्या पाच कारवाईत सहा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून ३ गावठी पिस्तुल, ११ जिवंत काडतुसे आणि ६ कोयते ताब्यात घेतले आहेत. या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

हेही वाचा- पुणे: शिवाजीनगर, डेक्कनमधील वीजपुरवठा रविवारी सकाळी बंद; महापारेषणकडून पूर्वनियोजित दुरुस्ती

तुषार उर्फ आप्पा सुभाष गोगावले वय- २९, अर्जुन हिरामण धांडे वय- १८, सचिन संतोष गायकवाड वय- १९, अतुल उर्फ चांड्या अविनाश पवार, गणेश रघुनाथ बनसोडे वय- २५, कृष्णा सीताराम पाल वय- १९ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. तर अल्पवयीन मुलाला गुंडाविरोधी पथकाने ताब्यात घेतलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या कारवाईत सराईत गुन्हेगार तुषार उर्फ अप्पा गोगावले ला गुंडाविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून तीन पिस्तुल, ११ जिवंत काडतुसे आणि ६ लोखंडी कोयते हस्तगत केले आहेत. तुषार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दोन खुनाचे, खुनाचा प्रयत्न, दरोडा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. दुसऱ्या कारवाईत रिक्षा संपाच्या दिवशी एका रिक्षा चालकाला मारहाण करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. याप्रकरणी अल्पवयीन मुलासह गुंडाविरोधी पथकाने तिघांना ताब्यात घेतलं. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. तर, गणेश रघुनाथ बनसोडे आणि अतुल उर्फ चांड्या अविनाश पवार या तडीपार गुंडांना ही ताब्यात घेऊन बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

हेही वाचा- राज्यपालांना काळे झेंडे दाखवणाऱ्या ‘स्वराज्य’ संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक, संभाजीराजेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “शिवरायांचा…”

तसेच, सोशल मीडियावर हातात कोयता घेऊन दहशत पसरविणाऱ्या कृष्णा पाल ह्याला देखील गुंडाविरोधी पथकाने अद्दल घडवत जेरबंद केले आहे. पाच कारवाईमध्ये सात आरोपींना गजाआड करत त्यांच्याकडून पिस्तुल, कोयता आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, गुन्हे पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने केली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 22:42 IST
Next Story
‘राज ठाकरे हेच खरे जातीयवादी’; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप