पिंपरी-चिंचवड : नितीन गिलबिले हत्येप्रकरणी विक्रांत ठाकूरला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अमित पठारे मात्र अद्यापही फरार आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी फॉर्च्युनर गाडीत नितीन गिलबिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
नितीनला रक्तबंबाळ अवस्थेत तिथेच फेकून पायावर गाडी घालून अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे पसार झाले होते. त्याचा शोध पिंपरी-चिंचवड पोलिस घेत होते. अखेर विक्रांत ठाकूरला लोणावळा अँबीवली परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. प्लॉटिंग आणि संपत्तीच्या वादावरून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. अद्याप अमित पठारे हा फरार आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. अमित पठारे पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यास हत्येचे कारण समोर येऊ शकेल. हत्येचा सीसीटीव्हीदेखील समोर आला असून अत्यंत क्रूरपणे जवळून पिस्तूलातून गोळ्या झाडून नितीन बिलबिलेची हत्या करण्यात आली आहे. त्याला जखमी अवस्थेत फेकून देण्यात आलं. पायावरून गाडी घालून दोन्ही आरोपी पसार झाले. अमित पठारेचा शोध पोलिस घेत आहेत.
