पिंपरी : शहर पोलीस दलात पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे सत्र सुरूच आहे. २६ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर आता आणखी १९ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केल्या आहेत. पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांची गुन्हे शाखेतून वाकड पोलीस ठाणे, सुहास आव्हाड (पिंपरी), विजयकुमार वाकसे यांची वाहतूक शाखेतून देहूरोड पोलीस ठाणे, रूपाली बोबडे यांची विशेष शाखेतून वाहतूक शाखा, नितीन फटांगरे यांची भोसरी ठाण्यातून रावेत पोलीस ठाणे, महेंद्र कदम यांची रावेतमधून वाहतूक शाखा, रविकिरण नाळे यांची वाकड पोलीस ठाण्यातून सायबर सेल, अंकुश बांगर नियंत्रण कक्षातून वाहतूक शाखा, प्रवीण कांबळे विशेष शाखेतून महाळुंगे आणि विजय ढमाळ यांची नियंत्रण कक्षातून गुन्हे शाखेत बदली झाली आहे. पोलीस ठाणे, विशेष शाखेत कार्यरत असलेल्या पाच सहायक निरीक्षकांच्याही बदल्या झाल्या आहेत. सचिन कदम यांची देहूरोड येथून गुन्हे शाखा, संदीप देशमुख यांची पिंपरीतून रावेत ठाणे, गणेश लोंढे यांची विशेष शाखेतून वाहतूक शाखेत, नकुल न्यामणे यांची चिखलीतून चाकण पोलीस ठाणे आणि राम गोमारे यांची हिंजवडीतून गुन्हे शाखेत बदली झाली आहे. तर, नियंत्रण कक्ष, महाळुंगे, भोसरी, सांगवी पोलीस ठाण्यातील सहा उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात किरण शिंदे यांची महाळुंगेतून विशेष शाखा, अशोक केंद्रे यांची भोसरीतून शिरगाव , बालाजी जोनापल्ले यांची भोसरीतून वाकड, सूर्यभान कदम यांची सांगवीतून नियंत्रण कक्ष, मुकेश मोहारे यांची भोसरीतून तळेगाव दाभाडे आणि संतोष डोलारे यांची नियंत्रण कक्षातून वाहतूक शाखेत बदली झाली आहे. हेही वाचा : पिंपरी : हप्त्यासाठी मासे विक्रेत्या महिलेवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न, दोन महिलांवर गुन्हा तीन अधिकाऱ्यांचे संलग्नतेचे आदेश रद्द वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांना नियंत्रण कक्षात संलग्न करण्यात आले होते. ते आदेश रद्द करून त्यांच्या नेमणुकीच्या मूळ ठिकाणी चिंचवड पोलीस ठाणे येथे पाठवण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक सतेज जाधव यांना मुख्यालयात संलग्न करण्यात आले होते. ते आदेश रद्द करून नेमणुकीच्या मूळ ठिकाणी हिंजवडी वाहतूक विभाग येथे पाठवण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक सचिन देशमुख यांची पिंपरी ते वाकड पोलीस ठाणे अशी बदली झाली होती. ती बदली रद्द करण्यात आली आहे.