पिंपरी-चिंचवड शहरात ४८ तासात चार खुनाच्या घटना घडल्या आहेत. यात एका विवाहित महिलेचा समावेश असून दिराने मित्राच्या मदतीने खून करून बलात्कार केल्याचं उघड झालं होत. या सर्व घटनांनी परिसरात खळबळ उडाली, या घटने प्रकरणी आरोपी दिराला पोलिसांनी अटक केली असून दुसरा आरोपी फरार आहे. निगडी, हिंजवडी, तळेगाव आणि चिखली परिसरात खुनाच्या घटना घडल्या आहेत.  

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या ४८ तासात चार खुनाच्या घटना घटना घडल्या आहेत. सोमवारी पहिली खुनाची घटना निगडी परिसरातील ओटास्कीम येथे उघडकीस आली. किरकोळ कारणावरून मद्यपान केलेल्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून अल्पयीन मुलांनी खून केला. यात, निगडी पोलिसांनी दोघांना अटक करून तीन अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. 

Pimpri road, road development works,
पिंपरी : रस्ते विकासाच्या ९० कोटींच्या कामात ‘रिंग’?
An increase in the price of silver compared to gold
सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात वाढ… हे आहे आजचे दर…
Unauthorized constructions in Vasai Virar city
पालिका गुंतली निवडणुकीच्या कामात, भूमाफिया जोमात
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

तर, दुसरी घटना पुणे-मुंबई जुना महामार्गालगत असलेल्या घोराडेश्वर डोंगरावर उघड झाली. दिरानेच वहिनीवर बळजबरी करत खून केल्याचं निष्पन्न झाले. गंभीर बाब म्हणजे मित्राच्या साथीने खून केल्याचं समोर आले असून अक्षय कारंडे नावाच्या मित्राने अगोदर महिलेवर बलात्कार केल्याचा तपासात पुढे आले आहे.

तिसऱ्या घटनेमध्ये हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वॉचमन असलेल्या मित्रांमध्ये मद्यपान करत असताना किरकोळ वाद झाला. यातूनच एका मित्राने दुसऱ्या मित्राचा खून केला आहे. अच्युत पूर्णा भूयान अस ३७ वर्षीय खून झालेल्या वॉचमनचे नाव आहे. तर, राजन शर्मा वय – १९ अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दोघे ही आसाम येथील असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे. 

चौथी घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. वीरेंद्र वसंत उमरगी वय – ४२ अस खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याचा मृतदेह चिखली येथील नेवाळे वस्ती येथे आढळला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध चिखली पोलीस घेत आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आल्यापासून शहरात शांतता नांदेल अस नेहमीच येथील नागरिकांना वाटत होते. मात्र, बलात्कार, खून, वाहनांची चोरी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळं आयुक्त कृष्ण प्रकाश यावर काही ठोस पाऊल उचलणार का, हे पाहावे लागेल.