पिंपरी– चिंचवडमध्ये चार चाकी वाहने रिक्षा आणि दुचाकीला धडक दिल्याची घटना समोर आली आहे. अपघातात तिघे जण किरकोळ जखमी असून एक जण गंभीर असण्याची शक्यता आहे. अपघात झाल्यानंतर स्वतः वाहनचालकाने जखमींना रुग्णालयात घेऊन गेला ते स्वतः डॉक्टर असल्याचं स्पष्ट झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस वायसीएम रुग्णालयात पोहचले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वल्लभ नगर बस स्थानकाच्या जवळ चार चाकी वाहनाने रिक्षा, दुचाकी ला धडक दिली. या अपघातात तिघे जण किरकोळ जखमी असून एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्वतः ज्या व्यक्तींने अपघात केला त्याने जखमींना रुग्णालयात घेऊन गेले. ते स्वतः डॉक्टर आहेत. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri doctor four wheeler rickshaw collides with two wheeler three people were injured kjp 91 amy
First published on: 24-06-2024 at 19:29 IST