पिंपरी : महापालिकेत वर्षानुवर्षे एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या ४३७ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी करण्यात येतील, असा दावा करणाऱ्या प्रशासनाने विधानसभा निवडणुकीनंतर अद्यापही बदल्या केल्या नाहीत. त्यामुळे ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांना अभय मिळाले आहे. प्रशासनाकडून बदली धाेरणाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका सेवेतील ‘अ’ ते ‘ड’ संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात २०१५ मध्ये धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार एप्रिल व मे महिन्यात बदल्या करणे अपेक्षित असते. मात्र, लोकसभा निवडणुका असल्याने कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या नव्हत्या. त्यानंतर आयुक्त शेखर सिंह यांनी ‘अ’ ते ‘ड’ संवर्गातील जे अधिकारी, कर्मचारी हे एप्रिल व मे २०२४ या महिन्यात बदलीस पात्र ठरत होते, त्यांची आणि ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वैयक्तिक, वैद्यकीय कारणास्तव बदली पाहिजे अशा कर्मचाऱ्यांची माहिती मागविली होती. त्यानुसार विभागप्रमुखांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह बदलीसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती सामान्य प्रशासन विभागाकडे ऑगस्ट २०२४ मध्ये सादर केली.

pimpri chinchwad municipal corporation
पिंपरी : अठ्ठावीस वर्षांच्या लढ्याला यश; ‘या’ प्रकरणी ‘सर्वोच्च’ निकाल
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Loksatta coverage on Mumbai BMC budget 2025 in marathi
रुपये ७४,४२७,४१,००० फक्त!, मुंबई महापालिकेच्या जवळपास पाऊण लाख कोटींच्या अजस्र अर्थसंकल्पातून होणार काय?
Decision to pay salaries of municipal employees and officers based on biometric attendance
वेळ पाळा, तरच पूर्ण वेतन! का घेण्यात आला हा निर्णय ?
GBS , Pune, Pune Municipal Corporation,
पुणे : शहरात ‘जीबीएस’चा प्रादुर्भाव वाढल्याने महापालिकेने घेतले मोठे निर्णय!
Replantation of 2097 trees for Thane Municipal Headquarters
६३१ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव; ठाणे महापालिका मुख्यालयासाठी २०९७ वृक्षांचे पुनर्रोपण
property tax defaulters in pune news in marathi
अभय योजनेचा फायदा घेणारेच झाले पुन्हा थकबाकीदार, नक्की प्रकार काय ?
pune municipal corporation winding road from siddhivinayak college to cummins college
कमिन्स महाविद्यालयाजवळील वाहतूक कोंडी सुटणार ? अडथळा ठरणारी भिंत तसेच दुकाने महापालिका प्रशासनाने काढली

हेही वाचा – पिंपरी : बावधनमध्ये तीन पिस्तूल, पाच काडतुसे, सहा कोयते जप्त

त्यात कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, मुख्य लिपिक, लिपिक, सहायक भांडारपाल, लेखापाल, उपलेखापाल या सारख्या पदांवर अनेक अधिकारी, कर्मचारी एकाच विभागात ठाण मांडून बसल्याचे समोर आले. ‘अ’ आणि ‘ब’ संवर्गातील ३४ अधिकारी तर ‘क’ मधील ३३२ कर्मचारी आणि तांत्रिक संवर्गातील ७१ असे ४३७ कर्मचारी हे बदलीसाठी पात्र झाले. या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ऑगस्टअखेर बदल्या होतील, असे सुरुवातीला सांगण्यात आले. त्यानंतर बदल्याची नस्ती (फाइल) तयार असून, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी बदल्या करण्यात येतील, असे सांगितले. मात्र, विधानसभा निवडणूक होऊन दोन महिने झाले. परंतु, अद्यापही बदल्या झाल्या नाहीत.

हेही वाचा – पुण्याच्या आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होणार! लवकरच नवीन सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे राहणार

अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या २०२३ मध्ये नियमित बदल्या केल्या होत्या. लोकसभा, विधानसभा निवडणुकीमुळे २०२४ मधील बदल्यांना विलंब झाला आहे. बदल्या केल्या जाणार आहेत, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

Story img Loader