पुणे : पिंपरीतील सेवा विकास बँकेचे माजी संचालक अमर मूलचंदानी यांच्या निवासस्थानावर सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) छापे टाकल्यानंतर मूलचंदानी यांनी तपासात असहकार्य तसेच पुरावे नष्ट केल्याप्रकरणी त्यांना पिंपरी पोलिसांनी अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तपासात असहकार्य तसेच पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अमर साधूराम मूलचंदानी यांच्यासह अशोक साधुराम मूलचंदानी, मनोहर साधुराम मूलचंदानी, दया अशोक मूलचंदानी, साधना मूलचंदानी, सागर मनोहर मूलचंदानी (सर्व रा. मिस्ट्री पॅलेस, तपोवन मंदिराजवळ, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ईडीचे अधिकारी सुधांशू श्रीवास्तव यांनी या संदर्भात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. अमर मूलचंदानी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना शुक्रवारी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीची पूर्तता करुन मूलचंदानी यांना सोमवारी (३० जानेवारी) अटक करण्यात आली, अशी माहिती पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकरराव अवताडे यांनी दिली.

हेही वाचा >>> इन्फोसिस हे पुण्याचं बाळ! नारायण मूर्ती यांची भावना

पिंपरीतील दी सेवा विकास सहकारी बँकेत बेकायदा कर्जवाटप आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) कारवाई केली होती. आरबीआयने दोन महिन्यांपूर्वी सेवा बँकेचा परवाना रद्द केला होता. बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने कारवाई करण्याची मागणी ठेवीदारांकडून करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी (२८ जानेवारी) ईडीच्या पथकाने पिंपरीतील अमर मूलचंदानींचे गणेश हाॅटेल तसेच तपोवन मंदिराजवळील मिस्ट्री पॅलेस या इमारतीतील मूलचंदानी यांच्या निवासस्थानी कारवाई केली. ईडीचे अधिकारी आणि पथक सकाळी साडेसहाच्या सुमारास मूलचंदानी यांच्या निवासस्थानी पाेहोचले, तेव्हा सदनिकेचा दरवाजाबंद होता. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दरवाजा वाजविला. तेव्हा सदनिकेतून प्रतिसाद देण्यात आला नाही. दरवाजा वाजविण्यात आल्यानंतर उघडण्यात आला नाही. अखेर सकाळी सव्वा आठच्या सुमारास पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्याशी ईडीच्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधला. तेव्हा पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. त्यानंतर मूलचंदानी कुटुंबीयांनी दरवाजा उघडला. ईडीचे अधिकारी तसेच पथक दोन तास मूलचंदानी यांच्या निवासस्थानसमोर थांबले होते. या काळात मूलचंदानी कुटुंबीयांनी पुरावे नष्ट करून तपासात असहकार्य केल्याचे ईडीचे अधिकारी श्रीवास्तव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा >>> बारामतीतील चांदगुडेवाडीत वाळू माफियांवर कारवाई, कऱ्हा नदीपात्रात वाळू उपसा

मूळचंदानी भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष अमर मूळचंदानी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष होते. आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात १२४ कर्ज प्रकरणे नियमबाह्य आढळून आली होती. सेवा विकास बँकेत बनावट कागदपत्रांद्वारे शेकडो कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले होते. या प्रकरणी अमर मूलचंदानी यांच्यासह २५ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रदेश उपाध्यक्षावर ईडीने कारवाई केल्याने पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri police arrested former seva vikas co operative bank director amar mulchandani for destruction of evidence pune print news rbk 25 zws
First published on: 30-01-2023 at 18:43 IST