पिंपरी : पोलीस ठाण्यासमोर वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्या ज्युसच्या तीन गाड्या, टेम्पो व दुचाकीवर अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जात असताना कारवाईला विरोध करीत कुटंबातील तिघांनी अतिक्रमण विभागातील अधिकार्यांना शिवीगाळ केली. पोलिसांनाही मारहाण केली. हा प्रकार दिघी पोलीस ठाण्यासमोर घडला. पोलिस अंमलदार सुधीर डोळस यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कंठाराम दामोदर (वय ५२), आशिष कंठाराम दामोदर (वय २०) व नलुबाई कंठाराम दामोदर या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी यांनी त्यांच्या ज्युसच्या तीन गाड्या, टेम्पो व दुचाकी आडवी लावून पोलीस ठाण्यामध्ये येणार्या - जाणार्या नागरिकांचा व पोलिसांचा वाहतुकीचा रस्ता अडविला. हेही वाचा - देव झालो, असे स्वत: म्हणू नये; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन वाहने काढण्यासाठी अतिक्रमण विभगाचे अधिकारी आले असता त्यांना शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांना मारहाण केली. तसेच, त्यांच्याकडील पेट्रोल स्वत:च्या व पोलिसांच्या अंगावर टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. सहायक पोलीस निरीक्षक अंभोरे तपास करीत आहेत. हेही वाचा - देव झालो, असे स्वत: म्हणू नये; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. क्षुल्लक कारणावरून कोयत्याने मारहाण, लोखंडी गजाने मारहाण केल्याचा घटना घडत आहेत. आता पोलिसांनाच मारण्यापर्यंत आरोपींची मजल गेली आहे. त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.