scorecardresearch

मनोबल वाढवा, शौर्याची परंपरा राखा ; पिंपरी पोलीस आयुक्तांचे आवाहन

सर्व पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करावा. मनोबल वाढवून राज्य पोलीस दलाची शौर्याची व त्यागाची परंपरा जोपासली पाहिजे.

मनोबल वाढवा, शौर्याची परंपरा राखा ; पिंपरी पोलीस आयुक्तांचे आवाहन
पोलीस मुख्यालयात पोलिसांसाठी तणावमुक्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले

सर्व पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करावा. मनोबल वाढवून राज्य पोलीस दलाची शौर्याची व त्यागाची परंपरा जोपासली पाहिजे. त्याचप्रमाणे, पोलिसांचा नावलौकिक अधिकाधिक उंचावला पाहिजे, असे आवाहन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले.

हेही वाचा >>> आगाऊ हवामानाचा अंदाज, योग्य नियोजनामुळे यंदा पुणे शहरात पूरस्थिती नाही

पोलीस मुख्यालयात पोलिसांसाठी तणावमुक्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, तेव्हा पोलीस आयुक्त शिंदे बोलत होते. अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त मंचक इप्पर, काकासाहेब डोळे आदी उपस्थित होते. यावेळी प्रसिध्द व्याख्याते सुनील पारेख यांनी पोलिसांना मनोबल वाढवण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. तणावमुक्त जीवन जगण्याबरोबरच यशस्वी होण्याचे सूत्रही त्यांनी व्याख्यानात सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या