पिंपरी : शहरातील तीन रुग्णालयांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या संशयितांनी ‘व्हीपीएन’ पद्धत वापरून ई-मेल केल्याने ‘आयपी ॲड्रेस’ सतत बदलत आहे. त्यामुळे आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी गुगलकडे धाव घेत ई-मेलचा ‘आयपी ॲड्रेस’ काय अशी विचारणा केली आहे.

शहरातील निगडी, भोसरी आणि चिंचवड परिसरातील तीन खासगी रुग्णालयांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल प्राप्त झाला होता. ‘मी रुग्णालयाच्या इमारतीमध्ये बॉम्ब ठेवला आहे. हे बॉम्ब रुग्णालयातील खाटा आणि स्वच्छतागृहामध्ये ठेवले आहेत. रुग्णालयातील एकही व्यक्ती जिवंत राहणार नाही. यामागे दहशतवादी चिंग आणि कल्टिस्ट यांचा हात असल्याचा धमकीच्या मेलमध्ये मजकूर आहे. रुग्णालय प्रशासनाकडून पोलिसांना माहिती देण्यात आली होती. निगडी पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत बॉम्बशोधक-नाशक पथकाला पाचारण केले. रुग्णालयाचा संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र, त्यामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

Pimpri, cleaning road Pimpri,
पिंपरी : तिजोरी ‘साफ’ केल्यानंतर आता यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाईसाठी नियमावली
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
railway employees
Railway Employees Arrested : धक्कादायक! वरिष्ठांकडून स्वतःचं कौतुक करून घेण्यासाठी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून ट्रॅक फेल करण्याचा प्रयत्न; तिघांना अटक
Petition to High Court to Create clear rules for compensation after damages due to electric shock
विजेचा धक्का लागल्याने अपघात, नुकसान भरपाईसाठी स्पष्ट नियमावली तयार करा; उच्च न्यायालयात याचिका
Chennai Food delivery Boy
Chennai : धक्कादायक! पार्सल देण्यास उशीर झाल्याने महिलेची शिवीगाळ, मन दुखावल्याने फूड डिलीव्हरी बॉयची आत्महत्या
MHADAs Mumbai Board of Housing applications deadline extended by 12 hours
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांचे अर्ज करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! अर्ज भरण्यासाठीची मुदत १२ तासांनी वाढवली
Mother and son did theft, Nagpur theft,
नागपूर : पोटासाठी काहीही! मायलेकाने चहाटपरी लावण्यासाठी…
New procedure regarding online booking by LPG Company to customers
आता ‘ओटीपी’ सांगितल्याशिवाय गॅस सिलेंडर मिळणारच नाही; कशी आहे नवीन प्रक्रिया?

हेही वाचा…‘ससून’ची बदनामी थांबवा! रुग्णालयाचे कर्मचारी आक्रमक; मोर्चाद्वारे थेट जिल्लाधिकारी कार्यालयावर धडकले

या धमकी प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात मेलधारक अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुधीर रंगराव पाटील (वय ७१, रा. निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. ई-मेलधारकाने रुग्णालयामध्ये येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार करण्यासाठी अफवा पसरवली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संबंधित मेल पाठवणाऱ्या संगणकाचा नेमका आयपी ॲड्रेस काय आहे, तो कुठून पाठवण्यात आला आहे, याबाबतची माहिती पोलिसांनी गुगलकडून मागविली आहे.

‘व्हीपीएन’ म्हणजे काय?

व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) हे सायबर सुरक्षेसाठी बनविण्यात आलेले नेटवर्क आहे. संगणक, मोबाइल अथवा इलेक्ट्रॉनिक गॅझेट सायबर हल्ल्यापासून सुरक्षित राहण्यासाठी हे नेटवर्क तयार केले जाते. मात्र, याचा धमकीचे मेल, संदेश पाठविण्यासाठी उपयोग केला जातो. यामुळे मेल, संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीचा आयपी ॲड्रेस सहजासहजी सापडत नाही.

हेही वाचा…नितेश राणेंच्या वक्तव्याच्या निषेधार्थ निवृत्त पोलिसांची निदर्शने; जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्यालयासमोर आंदोलन

संशयितांनी ‘व्हीपीएन नेटवर्क’ वापरले आहे. त्यामुळे ‘आयपी ॲड्रेस’ सतत बदलत आहे. गुगलकडे माहिती मागितली असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंबरिश देशमुख यांनी सांगितले.