श्वानाच्या पिल्लाला लोखंडी रॉडने मारहाण करणाऱ्या व्यक्तीविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपरीमधील गुप्ता ट्रेडर्स या दुकानासमोर घडली. याप्रकरणी हितेश कुंदनानी यांनी पिंपरी पोलिसात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ता ट्रेडरच्या दुकानात श्वानाचे पिल्लू येऊन बसायचं. यामुळे आरोपी गुप्ता याने पिल्लाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. श्वानाच्या पिल्लाला लोखंडी रॉडने ढकलत आणि मारहाण करत दुकानाच्या बाहेर काढलं. श्वानाचे पिल्लू त्याच ठिकाणी निपचित पडून होतं. अखेर त्याला प्राण्यांच्या रुग्णालयात नेण्यात आले असून त्याच्यावर उपचार करण्यात आले.

हेही वाचा – विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?

हेही वाचा – वसंत मोरे यांच्याकडे आहेत अनेक गाड्या, सोने आणि चांदी

याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुप्ता नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० कलम ११(१)(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.