पिंपरी : बावधन पोलिसांनी चार वेगवेगळ्या कारवाया करीत पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून तीन पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, सहा कोयते जप्त केली आहेत. आदेश राम टेमकर (वय २४), हरी महादेव पवार (दोघे रा. सुसगाव), सुमित संजय करेकर (रा. लवळे), गणेश उर्फ गुड्या अनिल पाटेकर (वय २३, रा. शिवणे) आणि केशव त्र्यंबक काळे (रा. बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जानेवारी रोजी बावधन पोलिसांनी रात्र गस्तीदरम्यान एक मोटार ताब्यात घेतली. मोटारीतून एक पिस्तूल, एक काडतूस आणि गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणात काळेला अटक करण्यात आली. त्यानंतर १३ जानेवारी रोजी गस्त घालत असताना काळ्या काचा असलेली एक मोटार पकडली. तिची झडती घेतली असता त्यामध्ये एक पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, चार कोयते आणि गुप्ती अशी शस्त्रे आढळून आली. याप्रकरणी करेकर याला अटक करण्यात आली.

हेही वाचा – शहरबात : ‘आयटीनगरी’ची कथा अन् व्यथा : ईवाय इंडिया ते इन्फोसिस…

हेही वाचा – पुण्याच्या आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होणार! लवकरच नवीन सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे राहणार

तिसऱ्या कारवाईमध्ये पवार याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहे. करेकर आणि पवार यांनी त्यांच्याकडील पिस्तूल हे सराईत गुन्हेगार टेमकर याच्याकडून आणल्याचे सांगितले. त्यामुळे टेमकर याला अटक केली. चौथ्या कारवाईमध्ये करेकर याचे तडीपार साथीदार पाटेकर आणि एक अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन कोयते जप्त केले आहेत. हे दोघेजण कोयते घेऊन दहशत पसरवताना आढळून आले. टेमकर याच्यावर सात, करेकर याच्यावर एक, पाटेकर याच्यावर सहा, काळे याच्यावर एक आणि अल्पवयीन मुलावर तीन गुन्हे दाखल आहेत.