scorecardresearch

निगडीत व्यावसायिक वादातून वाहनांची तोडफोड

तीन दुचाकीवरून आलेल्या आठ जणांनी रस्त्यावर अक्षरश: धुडगूस घालत पार्क केलेल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांना लक्ष्य केले.

पिंपरी- चिंचवड शहरातील निगडी परिसरात सात ते आठ जणांच्या टोळक्याने भरदिवसा पाच वाहनांची तोडफोड केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. साईनाथ नगर येथे ही घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. या घटनेचा तपास निगडी पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनाथ नगर येथे कानिफनाथ आणि रुपरजत नावाचे मेडिकल आहे, यावरूनच हा वाद झाल्याची प्राथमिक अंदाज आहे. शुक्रवारी कानिफनाथ या मेडिकल चा पहिलाच दिवस होता. त्यानंतर ही तोडफोड झाली यात कानिफनाथ मेडिकल मालकाच्या चारचाकी गाडीचा समावेश आहे.

तीन दुचाकीवरून आलेल्या आठ जणांनी रस्त्यावर अक्षरश: धुडगूस घालत पार्क केलेल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांना लक्ष्य केले. यात तीन दुचाकी आणि दोन चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले. दुचाकीवरुन आलेले हल्लेखोर हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या घटनेचा तपास निगडी पोलीस करत आहेत.पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pimpri unknown person vandalizes five vehicles in nigdi

ताज्या बातम्या