scorecardresearch

Premium

पिंपरी-चिंचवड : सराईत गुन्हेगाराकडून पिस्तुल आणि जिवंत काडतुसे जप्त; गुंडाविरोधी पथकाची कारवाई

खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर असलेल्या सराईत गुन्हेगाराकडून एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे गुंडाविरोधी पथकाने जप्त केली असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

Pistol and live cartridges
पिंपरी-चिंचवड : सराईत गुन्हेगाराकडून पिस्तुल आणि जिवंत काडतुसे जप्त; गुंडाविरोधी पथकाची कारवाई (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर असलेल्या सराईत गुन्हेगाराकडून एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे गुंडाविरोधी पथकाने जप्त केली असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. उमेश चंद्रकांत केदारे (वय २८) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला पिंपरी-चिंचवडच्या पुनावळे परिसरातून अटक करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंडाविरोधी पथकाची टीम रात्री गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी जगदाळे आणि गेंगजे यांना माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार उमेश चंद्रकांत केदारे हा पुनावळे येथील एका हॉटेल समोर थांबला आहे. त्याच्याकडे पिस्तुल आणि जिवंत काढतुसे आहेत. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं, त्याच्याकडे एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे आढळली आहेत.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

हेही वाचा – पुणे: सेवानिवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी पोलीस हवालदाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

आरोपी उमेश चंद्रकांत केदारे याच्यावर रावेत पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून झाल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस कर्मचारी विक्रम जगदाळे, नितीन गेंगजे आणि रामदास मोहिते यांच्या टीमने केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pistol and live cartridges seized from goon kjp 91 ssb

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×