scorecardresearch

पिंपरी: हिंजवडीत सराईत गुन्हेगार निलेश गायवळचे फलक; गुन्हा दाखल

सराईत गुन्हेगार निलेश गायवळ व अन्य दोघांचे फलक लावल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

nilesh gayval
हिंजवडीत सराईत गुन्हेगार निलेश गायवळचे फलक

सराईत गुन्हेगार निलेश गायवळ व अन्य दोघांचे फलक लावल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत चांदणी चौकात पाइपलाइन हायवे रोड लगत निलेश गायवळ याचे तसेच इतर दोघांचे वाढदिवसानिमीत्त अनधिकृत फलक लावण्यात आले होते. हिंजवडी पोलीस आणि पुणे महापालिका बावधन क्षेत्रीय कार्यालय यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करून हे अनधिकृत फलक काढून टाकले आहेत.

हेही वाचा >>>पुणे : मिळकतकराच्या ४० टक्के सवलतीसंदर्भात आज बैठक; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार

निलेशभाऊ गायवळ युथ फाउंडेशनचे सदस्य व अन्य दोघांवर अनधिकृत फलक लावल्याप्रकरणी कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालययाचे परवाना निरीक्षक निलेश काळुराम घोलप यांनी फिर्याद दिली आहे़.हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-03-2023 at 15:59 IST