६ मार्च रोजी उद्घाटन

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा सहा मार्च रोजी निश्चित झाला असून या दौऱ्यात मेट्रोच्या गरवारे स्थानकापासून आनंदनगर स्थानकापर्यंतचा प्रवास नरेंद्र मोदी मेट्रोतून करणार आहेत. त्यानंतर जवळील मोकळय़ा मैदानावरून जाहीर कार्यक्रमाद्वारे ते पुणेकरांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यापासून महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होणार असून राजकीय रणधुमाळी रंगणार आहे.

two ac local trains canceled due to technical glitches on central railway
मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलचा खोळंबा; दोन वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांच्या पासचे पैसे वाया
Air-conditioning system, Kalyan-CSMT local,
कल्याण-सीएसएमटी वातानुकूलित लोकलमधील वातानुकूल यंत्रणा बंद, प्रवाशांमध्ये संताप, महिलेला आली चक्कर
mumbai chembur to jacob circle monorail marathi news
स्वदेशी बनावटीच्या मोनोचे तीन डबे मुंबईत, उर्वरित नऊ मोनोरेल डिसेंबरपर्यंत ताफ्यात दाखल
Mumbai Coastal Road, bmc, 2 Lakh Vehicles, Worli Marine Drive, travel, South Channel, 12 Days,
सागरी किनारा मार्गावर १२ दिवसांत सव्वादोन लाखांहून अधिक वाहनांची ये-जा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बैठक घेण्यात आली. महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ढोरे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेता गणेश बीडकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, काँग्रेस गटनेता आबा बागुल, शिवसेना गटनेता पृथ्वीराज सुतार यांच्याबरोबरच विभागीय आयुक्त सौरभ राव, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, पिंपरीचे आयुक्त राजेश पाटील, पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा या वेळी उपस्थित होते. या बैठकीनंतर महापौरांकडून प्रत्यक्ष जागांची पाहणी करण्यात आली. महापालिका आवारात साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठ पुतळा स्मारकाचे लोकार्पणही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यासंदर्भात महापालिका, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालय, मेट्रो या सर्वाशी समन्वय ठेवून सूक्ष्म नियोजन केले जात आहे. आढावा बैठकीत सर्व ठिकाणांचा आढावा घेतला गेला असून याचा अहवाल शासकीय पातळीवर पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला जाणार आहे. याबाबत आढावा घेऊन पंतप्रधान कार्यालयाकडून अंतिम नियोजन जाहीर केले जाणार आहे.